शिर्डी विमानतळाजवळ हज हाऊस व्हावे; मुस्लिम समाजाकडून खा.विखे पाटील यांना निवेदन - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

16 November 2022

शिर्डी विमानतळाजवळ हज हाऊस व्हावे; मुस्लिम समाजाकडून खा.विखे पाटील यांना निवेदन




राजेंद्र बनकर-शिर्डी

 शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळा जवळ अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय,भारत सरकार (Ministry of Minority Affairs) च्या माध्यमातून हज हाऊस ची निर्मिती करण्याबाबत शिर्डी येथील मुस्लिम समाजाच्यावतीने अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खा.डॉ. सुजय दादा विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

खा.डॉ.विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात मुस्लिम बांधवांनी असे म्हटले आहे की, श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी हे तीर्थक्षेत्र केवळ भारतात नव्हेतर संपूर्ण जगात सुप्रसिद्ध आहे. श्री साईबाबांचा सबका मालिक एक व सर्वधर्म समभाव हा संदेश जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आहे,त्यालाच स्मरून केवळ देशभरातूनच नव्हेतर जगभरातून भाविक दर्शनासाठी श्री क्षेत्र शिर्डी याठिकाणी येतात.याच पावनभूमीमध्ये रेल्वेस्थानक,विमानतळ ई. अत्याधुनिक सुविधा संपन्न झाले आहे.

म्हणूनच शिर्डी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भविष्यातील गरज ओळखून महाराष्ट्र विमानतळ प्रधिकरण महामंडळ (MADC) च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे, आमची मागणी आहे की येथून मक्का - मदीना या सौदी अरेबियातील मुस्लिम समाजातील अतिशय पवित्र धार्मिक स्थळ मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी शिर्डी येथून विमान उड्डाण सुरू व्हावी अशी मागणी आपल्या माध्यमातून नागर विमानन मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Civil Aviation) ला करावी तसेच विमानतळाजवळ अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय,भारत सरकार (Ministry of Minority Affairs) च्या माध्यमातून  हज हाऊस ची निर्मिती करण्यात यावी जेणेकरून पुणे, नाशिक, अहमदनगर,औरंगाबाद,धुळे  ई. या प्रमुख जिल्ह्यामधून दरवर्षी हज व उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सुलभता व्हावी व मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक देखील शिर्डी विमानतळावर वळविल्यास तेथील देखील बोजा कमी होईल, सुजय दादा विखे पाटील नेहमीच आपल्या कार्यतत्पर आणि दूरदृष्टीकोन विकास कामातून आपली वेगळी ओळख संपूर्ण देशांमध्ये निर्माण करून आहेत, म्हणूनच दादांनी आपल्या मतदार संघात हा प्रकल्प यावा आणि त्याची पायाभरणी व्हावी, याचा पाठपुरावा करून मंजूर करून आणावा अशी विनंतीही  निवेदनकर्ते शिर्डी शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष समीर शेख व मुस्लिम समाजाकडून करण्यात आली, सुजय दादांनी देखील या मागणीबद्दल सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर हे प्रकल्प मंजूर करून आणू असे आश्वासन दिले.

LightBlog

Pages