प्रदेश तैलिक महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भागवत लुटे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी रविंद्र कर्पे - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

16 November 2022

प्रदेश तैलिक महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भागवत लुटे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी रविंद्र कर्पे

 

भागवत लुटे प्रदेश उपाध्यक्ष



रविंद्र कर्पे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष



चंद्रकांत शेजुळ निरीक्षक नगर जिल्हा


श्रीरामपूर (प्रतिनिधी):

प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी भागवत लुटे तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी बेलापुर येथील रविंद्र कर्पे तसेच अहमदनगर जिल्हा निरीक्षकपदी चंद्रकांत शेजुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.                                             प्रदेश तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तेली महासंघाची बैठक संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री तथा राज्याध्यक्ष  जयदत्त क्षिरसागर म्हणाले की, प्रदेश तेली महासंघाच्या  माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, संघटनेच्या माध्यमातून तेली समाजाला संघटीत करुन त्यांच्या अडचणी सोडविल्या जातील, समाजानेही संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले पाहीजे तरुण पिढीने परंपरागत व्यवसाया व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करुन समाजाचे नाव मोठे करावे असे अवाहनही क्षिरसागर यांनी केले.यावेळी सागर बाळासाहेब भगत यांची नाशिक युवा आघाडी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .

यावेळी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश सेक्रेटरी विजयराव काळे, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष अरविंद दारुणकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ नरहरी नागले, जिल्हा युवा अध्यक्ष सोमनाथ देवकर,अहमदनगर शहर युवा अध्यक्ष नितीनराव फल्ले, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप साळूंके, बाळकृष्ण दारुणकर, संतोष मेहेत्रे आदि मान्यवरांसह तेली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी शेवटी आभार मानले.

LightBlog

Pages