बाळा साहेब आणी
सत्यात सार्थ सपन
दूरदर्शी विचारधारा
शिवसेना संस्थापन
मराठी माणसा तुझे
वाचले जाणले मन
रोपाचा हो आम्रवृक्ष
अर्पिले तन मन धन
पोचले कणाकणात
सामना मुखपत्रातून
खडबडीत भाषा ती
निर्झर पाझर आतून
मार्मिक व्यंगचित्रात
लक्ष घ्यायचे वेधून
बाण बसे वर्मावरती
शर संधान रे साधून
वक्तृत्व शैली ठाकरी
आभाळा येई भेदून
अमृत धारा बरसती
माय माती भिजवून
सत्तेची कधी न हाव
दिधली खुर्ची टाळून
जनता सदैव म्हणून
जीव टाके ओवाळून
- हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
www.kavyakusum.com
🌸🌿🌺🍁🌼🌸🌺☘️🌼🌿🌸
मुजरा ..
बाळासाहेब आपले
जणूं इंद्रधनुष्यी रंग
स्वभाव अनेक पैलू
स्वतः एक व्यासंग
हाती जादुई कमाल
रेखाटती चित्र व्यंग
बरोबर हेरी माणूस
अति नितळ अंतरंग
दमदार तो आवाज
वाजे जणूं रणशिंग
ऐकता भाषण तया
अंगात उसळी झिंग
जाणता विचारधारा
विरोधी होतात दंग
मराठी मना आधार
बांधला उध्दारां चंग
भिती नाही माहीत
सदैव छेडती जंग
नजर ती पत्रकारी
ओळखी सगळे ढंग
उपकृत केले इतके
कसे फेडावे ते पांग
कितीदा करे मुजरा
जन प्रेम तव अथांग
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com