लहान मुलीला धडक मारुन रिक्षा चालक पसार,अपघातात मुलगी किरकोळ जखमी वाहतूक नियंत्रण शाखेचे मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी का सोईस्कर दुर्लक्ष ?
राजेंद्र बनकर - शिर्डी
रविवार दि ६ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील साईप्रसादालयासमोर एका बेशिस्त रिक्षा चालकाने नाशिक येथील साईभक्तांना धडक देऊन तो पसार झाल्याची घटना घडली आहे.
साईबाबा प्रसादालय मेन गेट समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला असुन या अपघातात लहान मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.घटना घडताच संस्थान कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून या साईभक्तांना दिलासा दिला , सुदैवाने त्या चिमुकलीला गंभीर इजा झाली नसल्याने यावेळी साईभक्तांनी सुटकेचा श्वास सोडला माञ रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येऊन धडक देणाऱ्या रिक्षा चालका विरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
नाशिक येथील साईभक्त गायकवाड कुटुंब हे श्री साईबाबा दर्शनासाठी आले होते दर्शनानंतर ते येथील साईप्रसादालयात प्रसाद घेण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना घटना घडली आहे.
साईप्रसादालयात दररोज ३० ते ४० हजार भाविक प्रसाद घेण्यासाठी येतात तसेच शालेय विद्यार्थी नागरिकांची मोठी वर्दळ त्यातच तीन चाकी रिक्षा, ॲपे रिक्षा , शिंगणापूर जाणारी वाहने ही रस्त्यात बराच वेळा साईभक्तांशी वादविवाद होत असल्याचे प्रकार घडत आहे.
साईप्रसादालय गेटवर बऱ्याच वेळा गर्दीचा फायदा घेऊन महिलांची छेडछाडीचे प्रकार तसेच पाकीट मारीच्या घटनाही घडत आहे. त्यातच रिक्षा चालकाची मनमानी वाढत चालली असुन याला लगाम कोण घालणार असा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे. हाकेच्या अंतरावर वाहतूक शाखा व पोलीस स्टेशन असताना आणि साईप्रसादालयासमोर पोलीस चौकी असतांना याठिकाणी एकही पोलीस , वाहतूक पोलीस उपलब्ध नसतो अशी खंत नागरिक व्यक्त करत आहे. तर प्रत्यक्षात अपघात झाल्यानंतर समंधीत रिक्षा चालकाने थांबून साईभक्तांना मदत करणे अपेक्षित असतांना तो तेथून पळून गेल्याने अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असुन श्री साईबाबा प्रसादालयासमोरील रिक्षा चालकांची सुरू असलेली असलेली मनमानी थांबवा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तसेच साईबा संस्थानचे सुरक्षारक्षक देखील अनेकदा बघ्याची भूमिका यामुळे येथील साईभक्तांच्या सुरक्षततेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत अणि शिर्डी पोलीस स्टेशनने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकामधून होत आहे