संदिप मिटके यांचा कार्यकाळ वाढवून मिळवा समाजवादी पार्टीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

07 November 2022

संदिप मिटके यांचा कार्यकाळ वाढवून मिळवा समाजवादी पार्टीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन


 


शौकतभाई शेख श्रीरामपूर 

 श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या धाडसी कर्तबगारीमुळे त्यांचा कार्यकाळात कार्येक्षेत्रातील गुन्हेगारीवर मोठा वचक बसलेला असल्याने तथा श्रीरामपूर विभागातील त्यांचा शासकीय सेवेचा कार्यकाल पुर्ण होत असल्याने अन्य ठिकाणी त्यांच्या बदलीची चर्चा होत असुन शासनाने त्यांची अन्यत्र बदली न करता श्रीरामपूर विभागातच आणखी त्यांना शासकीय सेवेचा कार्यकाल वाढून द्यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल निवेदन पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांची कामे ही खुपच चांगली आणि पारदर्शकता ठेवणारी आहे, कार्येक्षेत्रातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करणारी आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी आहे,करीता त्यांना श्रीरामपूर विभागातच आपल्या सेवेचा कार्यकाळ वाढवून मिळावा कारण ऐकेकाळी श्रीरामपूर शहर व परिसर हे गुन्हेगारीचे गड मानली जात असे, मात्र श्री. मिटके साहेबांनी अनेक गुन्हेगारांना योग्य धडा शिकवत त्यांना वठणीवर आणले आहे, म्हणून त्यांची अन्यत्र बदली न करता त्यांच्या शासकीय सेवा कार्याचा कार्यकाल याच ठिकाणी वाढून देत याठिकाणीच त्यांना कार्यरत ठेवण्यात यावे,अन्यत्र कोणत्याही ठिकाणी त्यांची बदली करु नये असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रति पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलिस उपमहानिरीक्षक नाशिक,

जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलिस प्रमुख अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. आबु असिम आझमी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

LightBlog

Pages