राजेंद्र बनकर - शिर्डी
राजकारणासह क्रिकेट प्रेमी म्हणून ओळखले जाणारे आमदार रोहित पवार हे खेळाडूंना कायम प्रतिसाद आणि प्रोत्साहन देत असतात. खेळाच्या आणि खेळाडूंच्या बाबतीत त्यांचा दृष्टीकोन नेहमीच सकारात्मक राहिला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मंथन शिबिराला उपस्थिती लावण्यासाठी शिर्डीत आले असता त्यांनी भारतातील साई नाईन ग्रुप ची पहिली शाखा वेनी स्पोर्ट वेयरला शिर्डी सदिच्छा भेट दिली.शिर्डी येथील भारतातील पहिले आउटलेट असलेल्या साई नाईन ग्रुपचे वेनी स्पोर्ट वेयर भारतातील अनेक राज्यांमधील क्रिकेट संघाना व आयपीएल संघाना जर्सी पुरविण्याचे काम करते. स्वतः आमदार रोहित पवार यांनी भेट दिली यावेळी वेनी स्पोर्टचे सर्वेसर्वा व शिर्डीतील युवा उद्योजक साईराज गायकवाड पाटील यांच्या मातोश्रींनी औक्षण केले. याप्रसंगी आ. रोहित पवार यांनी या शोरुम मधील खेळाडूंसाठी असलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंबाबत बारकाईने विचारपूस करत आपल्या खिळाडू वृत्तीचा प्रत्यय दिलाय.
यावेळी आपल्या भागातुन असेच अनेक खेळाडू तयार होतील असे आश्वासन वेनी स्पोर्ट वेयरचे संचालक साईराज गायकवाड यांना दिले. तसेच त्यांच्या संस्थेच्या शरदचंद्र पवार विटरनेस क्रिकेट क्लब पुणे. व वेंनी स्पोर्ट वेयर या शाखांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रसंगी अरूण गायकवाड, संगीता गायकवाड, साईराज गायकवाड, स्नेहल गायकवाड,मंदार पाटील,राकेश कोते,डॉ. प्रशांत गोंदकर, अतुल गोंदकर, किरण पारखे, अनिता पारखे, रवींद्र तुपे, कृष्णा साळवे आदींसह गायकवाड परिवारातील सर्व सदस्य उपस्थीत होते.