अकोले (प्रतिनिधी) : तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जयकिसान सह.दूध उत्पादक संस्था,कळस बु च्या चेअरमन पदी भाऊसाहेब पुंजा वाकचौरे तर व्हा. चेअरमन पदी अशोक पुंजा वाकचौरे यांची निवड करण्यात आली.
अगस्ती साखर कारखान्याचे संचालक कैलास भाऊ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयकिसान सहकारी दूध संस्थेची सन २०२२ ते २०२७ या पंच वार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण गटातून अशोक रेवजी वाकचौरे,अशोक पुंजा वाकचौरे, मच्छिंद्र कारभारी वाकचौरे, संजय बापू नवले, रामनाथ मुरलीधर ढगे, राजेंद्र रखमा कातोरे, ओबीसी प्रवर्गातून भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, एन. टी. प्रवर्गातून निवृत्ती माधव मोहिते, एस.सी. प्रवर्गातून अनिल दादाभाऊ गवांदे,महिला राखीव मधून सौ. वैशाली बादशहा वाकचौरे, सौ.रोहिणी भानुदास वाकचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या बिनविरोध निवडी होण्यासाठी ज्येष्ठ नेते सिताराम वाकचौरे, संगमनेर साखर कारखाना संचालक संभाजी वाकचौरे, डी. टी. वाकचौरे, कळस सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे यांनी सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. दहातोंडे यांनी तर सहाय्यक मधुकर ढगे यांनी सहकार्य केले.संस्थेचे नूतन चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे हे कळस गावचे माजी सरपंच व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना अकोले तालुकाचे माजी अध्यक्ष आहेत. व्हा.चेअरमन अशोक वाकचौरे हे वि.का सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.