सामाजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांच्या पुढाकारातून - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

08 November 2022

सामाजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांच्या पुढाकारातून





 विद्यार्थी दिनानिमित्त गोरगरिबांच्या 

मुलांना शालेय साहित्यांचे वाटप


वर्धा (प्रतिनिधी) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दरवर्षी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.जनकल्याण फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांच्या नेतृत्वात वर्धा येथील गोरगरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.१० मुलांना जनकल्याण फाऊंडेशन मार्फत शिक्षणं उपयोगी साहित्य वाटप केले यात पेन,पेन्सिल, शोपणर, इरेजर व नोटबुकचा समावेश आहे.जनकल्याण फाऊंडेशन तर्फे नेहमीच महापुरुषांची जयंती, पुण्यतिथि किंवा विविध दिना निमित गोरगरीब मुलांना पुस्तके वाटप करण्यात येते.जनकल्याण फाऊंडेशन संपुर्ण महाराष्ट्रात पियूष रेवतकर यांच्या नेतृत्वात सामजिक काम करत आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतावेळी जनकल्याण फाऊंडेशन टीम वर्धाचे पदाधिकारी सुदीप इंगळे,मोहित वैद्य, संदेश आत्राम आदि उपस्थित होते.

LightBlog

Pages