शौकतभाई शेख श्रीरामपूर
एस टी बस चे पहिले कंडक्टर श्री.लक्ष्मण कवाटे यांचा प्रवासी संघटना श्रीरामपूर यांच्यावतीने अहमदनगर येथील राम अवतार चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे बाल भवनमध्ये श्री.कवाटे आपल्या शतक पूर्ती जीवनाकडे वाटचाल सुरू करीत असल्याबद्दल त्यांचा आनंद सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली संस्थेचे राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक अशोक उर्फ बाबुशेट बोरा यांचे हस्ते यांचे करण्यात आले.
यावेळी हिंद सेवा मंडळाचे मार्गदर्शक अजित बोरा, एस टी चे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ, दत्तात्रय काशीद, पुणे येथील शैलजा मोळक, स्वागत प्रमुख मोहनलाल मानधना, प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड, रामेश्वर मनियार आदि मान्यवर उपस्थित होते.