शौकतभाई शेख श्रीरामपूर:
येथील उम्मती सोशल वेलफेयर सोसायटी आणि मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शक्ती फॅमिली क्लिनिक, श्रीरामपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील जनतेला तज्ञ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबीर उम्मती चे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे हे सहावे वर्ष आहे. यावेळी मेडिकव्हर हॉस्पिटल, संगमनेरचे प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. गौरव वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरवर्ग व त्यांची सर्व टीम उपस्थित होती. सदर शिबिरासाठी अध्यक्ष म्हणुन जमात ए उलेमा हिंद चे राज्य समन्व्यक मौलाना इर्शादउल्लाह कासमी तर प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, हृदयरोगतज्ञ डॉ. अक्षय शिरसाठ, डॉ. रविंद्र जगधने, खा. आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव जयंत चौधरी, प्रसन्न शेटे, माजी नगरसेवक मुखतारभाई शाह, सैफ शेख, अमीन शाह, हाफिज सुलेमान आदी उपस्थित होते.
या आरोग्य तपासणी शिबिरात श्रीरामपूर तालुक्यामधील सुमारे ३३० रुग्णांच्या हृदयरोग, मेंदूविकार, मणक्याच्या तक्रारी, स्त्रीरोग, मुतखडा, रक्तदाब, मूत्रविकार अशा विविध आजारांवर उपचार करण्यात आले. पैकी सुमारे ५५ रुग्णांना पुढील तपासणीसाठी मेडिकव्हर हॉस्पिटल, संगमनेर येथे संदर्भीत करण्यात आले.यावेळी मेडिकव्हरचे न्युरो व स्पाईन सर्जन डॉ. प्रमोद गांगुर्डे, युरोलॉजिस्ट डॉ. संजय धनगर, स्त्रीरोगतज्ञ डॉ. एकता वाबळे तसेच होमिओपॅथी तज्ञ डॉ. खुशबू शेख यांनी रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य औषधोपचार केले. तसेच यावेळी ईसीजी, रक्तशर्करा, बीपी, आदी तपासण्या संपूर्णपणे मोफत करण्यात आल्या त्यासाठी श्री. मुखतार शेख व सागर अडागळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
शिबिराचे सूत्रसंचालन शक्ती क्लिनिकचे संचालक , व उम्मती फाउंडेशनचे सचिव डॉ. तौफिक शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शहानवाज सर यांनी तर आभार प्रदर्शन फिरोज पठाण सर यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी उम्मतीचे अध्यक्ष सोहेल शेख, युसूफ लाखानी, ऍड.आरीफ शेख, शाकीफ शेख, वसीम जहागीरदार, समीर शेख, अलीम बागवान, शाहरुख बागवान, डॉ. अहतेशाम शेख, डॉ. नावेद खान, डॉ. सोहेल शेख, डॉ. शुभम गोंधणे, डॉ. शोएब अहमद, आफताब पठाण, मोईन मन्सूरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.