शिर्डी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या दोन दिवशीय शिबिराचा समारोप - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

07 November 2022

शिर्डी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या दोन दिवशीय शिबिराचा समारोप






 राजेंद्र बनकर - शिर्डी 

 राज्यातील सध्याच्या सरकारच्या डोळ्यांदेखत प्रकल्प जाणे ही लाजिरवाणी गोष्ट असुन टाटा एअरबसचा प्रकल्प हलवण्यापेक्षा केंद्रातील सरकार देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प कार्यरत कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे होते.आज या प्रकल्पाची अवस्था बिकट आहे. विमाने तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ उपलब्ध असताना या प्रकल्पांच्याकडे ऑर्डर्स नाहीत, नवीन काम नाही. 

वायुदल शक्तिशाली करण्यासाठी रशियन तंत्रज्ञानाची मदत घेऊन लढाऊ विमाने निर्मिती करण्याचा प्रकल्प भारतातील बंगलोर, नाशिक, आणि लखनऊ अशा तिन ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले.प्रधानमंत्र्यांनी या तिन्ही प्रकल्पांच्या बळकटी करण्यासाठी कष्ट घेतले असते तर मी त्यांचे स्वागत केले असते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

       शिर्डी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या दोन दिवशीय शिबिराचा आज शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप झाला. शरद पवार मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा स्थितीतही त्यांनी आज शनिवारी शिर्डी येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला हजेरी लावली. यावेळी ते कार्यकर्त्यांना सविस्तरपणे संबोधित करू शकले नाहीत. त्यांनी आपलं भाषण थोडक्यात उरकलं. यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, मी सगळ्यांची भाषणं ऐकली नाहीत, पण काही भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. सध्या मी एवढंच सांगू इच्छितो की, आज मला सविस्तर बोलणं शक्य नाही. कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसा सल्ला दिला आहे. आणखी १० ते १५ दिवसांनी मला नेहमीचं काम करता येईल, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पण या शिबिरातीन एक संदेश जात आहे की, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये आहे, ही संधी लवकरच मिळेल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.एवढं बोलून शरद पवारांनी अवघ्या काही मिनिटांत आपलं भाषण आटोपतं घेतलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांचं उर्वरित भाषण वाचून दाखवले  यावेळी पवार यांनी सांगितले की.केंद्र व राज्यातील नेतृत्वामधील धोरणात अंतर असू शकते केंद्रातील सत्तेने त्यांचा मान राखायला हवा आज अनेक राज्यांमध्ये केंद्रातील सत्तेच्या विचारांशी सहमत नसलेले सरकार आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. अगदी कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गोवा या राज्यातील जनतेने देखील भाजपाला दूर ठेवले होते. परंतु केंद्रातील सत्ताधीशांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विधानमंडळ सदस्य फोडून या राज्यामधील सत्ता हस्तगत केली. एकंदरीत गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, हरियाणा हे राज्य वगळता देशातील जनतेने भाजपला नाकारलेले आहे. सामान्य माणसांना ईडी, सीबीआय, आयकर विभाग, केंद्रीय निवडणूक आयोग, एनसीबी वगैरे यंत्रणाची फारशी माहिती नव्हती परंतु या यंत्रणांच्या गैरवापरामुळे देशात सर्वत्र चर्चा सुरू आहे. देशाचे नेतृत्व चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. अशा घटकांनी सत्तेचा हव्यात सोडून देशाचा विचार करणं आवश्यक आहे. परंतु तसे न होता अनेक राज्याच्या नेतृत्वावर अनैतिक हल्ला केला जातो. राज्यातील सत्ता कायम राखणे व नवीन सत्ता स्थान बळकवणे हाच त्यांचा अजिंठा ठरलेला असुन,कोणाताही पक्षपात, राग अनुराग न बाळगता सर्व प्रकारच्या लोकांसाठी घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करण्याची शपथ घेतली जाते. थोडक्यात प्रधानमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सौख्य शांती आणि प्रगतीच्या मार्गावर राष्ट्राला न्यायला हवे प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीकडे अशी सर्व सर्व समावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकता असायला हवी परंतु दुर्दैवाने तसे सध्या दिसत नसल्याचे पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी एक सुसंस्कृत नेता असा आपला लौकिक कायम ठेवला त्यांनी प्रशासकीय निर्णय घटनेची विशिष्ट चौकट ओलांडून घेतले नसल्याचा पवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

      प्रधानमंत्र्यांनी आपले अधिक लक्ष कमजोर होत असलेल्या अर्थव्यवस्थेकडे आणि प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे द्यायला हवे.असे स्पष्ट करीत पवार म्हणाले की महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास सध्याचे राज्यकर्ते कोठे आहेत. आणि काय करताय असा प्रश्न पडतो. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या अनेक प्रसंगी व अनेक गोष्टीवर होणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यांचा विचार संकुचित स्वरूपाचा आहे हे प्रकर्षाने दिसून येतात हे चित्र समाधानकारक नाही.पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मी मनापासून कौतुक करतो या शिबिरात सहभागी झालेला प्रत्येक जण परत जाताना नवी ऊर्जा घेऊन जाईल आणि परिवर्तनाच्या कार्यामध्ये स्वतःला झोपून देईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

LightBlog

Pages