ज्येष्ठ पत्रकार मुश्ताकअली शाह यांच्यावर त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छांचा वर्षाव ! - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

10 November 2022

ज्येष्ठ पत्रकार मुश्ताकअली शाह यांच्यावर त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छांचा वर्षाव !




 राहाता समीर बेग:

राहाता पंचक्रोशीतील एक नवाजलेले व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबांच्या मदतीसाठी सातत्याने धावून येणारे परोपकारी व्यक्तीमत्व  म्हणून ज्यांची ओळख असे मुश्ताकअली शाह यांच्यावर आज त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ विविध क्षेत्रातून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, विविध ठिकाणी विविध मान्यवरांकडून वाढदिवसाप्रित्यर्थ अभिष्टचिंतन करण्यात आले. मुश्ताक शाह यांचा जीवन संघर्ष सांगायचा झालातर एका गरीब घरण्यात जन्म घेऊन देखील त्यांनी कठिण परिस्थितीवर यशस्वीरित्या मात केली आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती जरी जेमतेम असली तरी कोणाकडून कुठलाच स्वार्थ न जोपासता त्यांनी नेहमी निर्पेक्षतेने स्वतः ला सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे,

आज सामाजिक कार्यात सर्वात अग्रस्थानी शाह मुश्ताक अली हे नाव जे पंचक्रोशीत गाजत आहे. त्यामागे आज शाह मुश्ताक अली यांचा फार मोठा त्याग आहे,त्यांनी आज रोजी आपल्या वयाचे ५६  वर्ष पुर्ण केले असून ५७ व्या वयात पदार्पण करत आहे. पत्रकारीता क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या उतुंग कर्तबगारी ठसा उमटविला असुन अनेक नवोदित पत्रकारांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. त्यांच्या  साप्ता.भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन या वर्तमानपत्राचे संपादक तथा अनेक वर्तमानपत्र संपादक वार्ताहरांचे मार्गदर्शकही आहेत,जवळपास २० वर्षांपासून त्यांनी पत्रकारीता क्षेत्रात आपली एक अनोखी ओळख निर्माण केली आहे,

सामाजिक,शैक्षणिक, अध्यात्मिक,राजकीय, शासकीय, प्रशासकिय, निमशासकीय आदी क्षेत्रात त्यांना माननारा मोठा वर्ग आहे,सर्वांशी हसुन खेळून सदैव हस्तमुख राहणारे आपल्यासोबत इतरांनाही आनंदीत ठेवू इच्छिणारे असे सर्वांना हवेहवेसे वाटणारे दिलदार व्यक्तमत्व शाह मुश्ताकअली यांना जनसामान्यांच्या कामांसाठी निरोगी दिर्घायुष्य लाभो ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा.

LightBlog

Pages