शिर्डी सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या मागणीला यश , साईबाबा संस्थानने प्रमुख मागण्या मान्य केल्या - शिवाजी गोंदकर मा.नगराध्यक्ष - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

10 November 2022

शिर्डी सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या मागणीला यश , साईबाबा संस्थानने प्रमुख मागण्या मान्य केल्या - शिवाजी गोंदकर मा.नगराध्यक्ष




 [ माञ काही कारणास्तव श्री साईबाबा द्वारकामाई राञभर उघडी ठेवता येणार नाही ]


राजेंद्र बनकर - शिर्डी 

शिर्डी ग्रामस्थ व सर्व राजकीय पक्ष्याच्या वतीने श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खा सुजय विखे पाटील यांच्या सूचनेनुसार  साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत याच्याबरोबर विविध मागण्याबाबत ग्रामस्थ व सर्व राजकीय पक्ष्यांच्या प्रमुख नेत्यांची सकारात्मक  चर्चा झाली यावेळी ग्रामस्थांच्या काही प्रमुख मागण्यापैकी साईभक्तांना पूर्वीप्रमाणे साईसमाधीचे दर्शन काचा विरहित मिळावे ही प्रमुख मागणी मान्य करण्यात आली.

तर बाबांची द्वारकामाई साईभक्तांनसाठी खुली करण्यात यावी व धुनी जवळून दर्शन घेता यावे ही मागणी मान्य केली माञ मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले की रात्रभर द्वारकामाई उघडी ठेवता येणार नाही कारण की  तेथे वाढदिवस साजरा करतात व  वैयक्तिक सत्कार करतात.हा राजकीय अड्डा नसून पवित्र स्थळ आहे ह्या कारणाने द्वारकामाई रात्रभर उघडी ठेवता येणार नाही असे बानायत यांनी सांगितले आहे.शिर्डी ग्रामस्थांना सुलभ दर्शन मिळावे , मंदिरातील चार ही गेट  दर्शनासाठी खुले करण्यात यावे या चारही गेटने ये जा करण्यासाठी खुले करावे , बाबांच्या चारही आरती वेळी गुरुस्थानाला जे काही साईभक्त व  ग्रामस्थ प्रदक्षिणा घालतात त्या ही चालू कराव्या हि मागणी पूर्ण करण्यात आली.मागील एक वर्षा पासून तेलगू,कन्नड,गुजराथी,भाषांचे साई चरित्र प्रकाशन बंद आहे ते चालू करावे त्यासाठी अधि.बानायत यांनी ते तत्काळ चालू करावे असे संबधीत अधिकारी यांना सांगितले.

तसेच ग्रामस्थ च्या बरोबर चर्चा करताना त्या  म्हणाल्या की माझी भेट घेण्यासाठी किंवा कोणीची काही तक्रार असेल असेल तर मला दुपारी तीन नंतर कोणीही भेटू शकतो.

यावेळी अनेक विषयावर  ग्रामस्थाबरोबर चर्चा  करण्यात आली तसेच त्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी शिर्डी ग्रामस्थ भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,डॉ.एकनाथ गोंदकर,सुधाकर शिंदे,बाबासाहेब कोते,ज्ञानेश्वर आबा गोंदकर,माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,अभय शेळके,महेंद्र शेळके,रमेशभाऊ गोंदकर,प्रतापराव जगताप, सचिन कोते,सुमित शेळके,संजय शिंदे,गजानन शेर्वेकर,प्रकाश शेळके,विजय जगताप,सुजित गोंदकर,अशोक गोंदकर,सचिन शिंदे,अशोक कोते,संदीप सोनवणे,विजय गोंदकर,अमृत गायके,प्रसाद शेळके,अशोक पवार,अमित शेळके,सुनील गोंदकर,मंगेश त्रिभुवन,अशोक गायके,अमोल गायके,प्रतीक शेळके,गणेश गायके,गणेश कोते,नरेश सुराणा आदीसह शिर्डी ग्रामस्थ  उपस्थित होते.

LightBlog

Pages