भारतीय स्वातंत्र्य संग्रामात खरी देशसेवा करणा-यांमध्ये अव्वलस्थानी असलेले मौलाना अबुल कलाम आझाद हे तमाम भारतीयांना सुपरिचित आहे त्याकाळी स्वातंत्र्यपूर्व काळात जगातील प्रसिध्द विद्वान म्हणून ओळख निर्माण केलेल्या प्रसिध्द सूफी वडील पंडित मौलाना खैरुद्दीन व आई आलिया बेगम यांच्या घरी मोईउद्दीन अहेमद खैरूद्दीन बख्त अर्थात मौलाना अबुल कलाम आझाद या महान शिक्षणतज्ञाने दि ११नोव्हेंबर १८८८ रोजी जन्म घेतला त्यावेळी मौलाना खैरूद्दीन यांच्या कुटुंबाचे वास्तव्य पवित्र तिर्थक्षेत्र'मक्का'या ठिकाणी होते जन्मानंतर तिस-याच वर्षी १८९० मध्ये त्यांचे कुटुंब कलकत्ता येथे स्थलांतरीत झाले तेथेच त्यांचे वडील खैरूद्दीन यांनी अबुल कलाम यांना त्यांच्या लहान वयातच घरच्या घरी फारशी, उर्दू या धार्मिक शिक्षणाबरोबरच इंग्रजीचेही शिक्षण दिले यामुळेच लहानग्या वयातच कलामांना वाचनाची आवड निर्माण झाली होती. कलाम यांनी १९०३ मध्ये 'दर्स-ए-निजामिया'ही फारसी भाषेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन 'अलीम' प्रमाणपत्र मिळवले तर१९०६ मध्ये मक्केतील मौलवींनी मोईऊद्दीन यांचा सत्कार करीत 'अबुल कलाम' ही पदवी दिली जिचा अर्थ विद्या वाचस्पती असा होतो कलाम नेहमी लेखनात शेवटी ते जून्या बंधनातून मुक्त होण्याची प्रेरणा निर्माण करणारा शब्द अर्थात'आझाद' वापरत तेच मोईऊद्दिन पुढे मौलाना अबुल कलाम आझाद या नावाने ओळखले जावू लागले
इंग्रजांच्या काळात हिंदू-मुस्लिम यांमध्ये निर्माण झालेला तेढ कमी करण्याच्या उद्देशाने मौलाना अबूल कलाम यांनी त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी लेखन कार्य हाती घेतले त्यासाठी कलकत्ता येथून 'अलहिलाल'हे साप्ताहिक १९१२ मध्ये सुरू केले आपल्या वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच वाचनालय व डिबेटींग सोसायटी सुरू करणा-या कलाम यांनी याच काळात 'लिसानुलसिदिद्क' या मासिकाचे संपादनही केले अलहिलाल मधून लोकजागृती करताना त्यांना बराच पत्रप्रपंच करावा लागला त्यात त्यांचेकडून इंग्रजांच्या विरोधात लेख लिहिले गेले त्यातूनच त्यांना बंगाल प्रांताच्या बाहेर 'रांची' येथे ४ वर्षे नजरकैदेत रहावे लागले १९१४ मध्ये इग्रंजांबदद्लची सत्य परिस्थिती मांडल्याने 'अलहिलाल'वर बंदी घातल्यानंतर त्यांनी 'अल-बलाग' या नावाचे दुसरे वृत्तपत्र सुरू केले राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेतून लिहिल्या गेलेल्या लेखाने प्रभावित झालेल्या महात्मा गांधी यांची त्यावेळी इग्रंजांनी कलाम यांचेशी भेट होवू दिली नाही त्यासाठीे प्रथम भेट घेण्यासाठी त्यांना १९२० मध्ये दिल्ली गाठावी लागली, त्या भेटीचा संदर्भ महात्मा गांधी यानी 'इंडीया विन्स फ्रीडम' या ग्रंथात देताना म्हटले, "मला असे वाटते की आम्ही दोघेही एकाच छताखालून जात आहोत मात्र मतभेद असूनही आम्ही वेगवेगळा मार्ग हाताळला नाही त्यांच्या लेखाने त्यांच्यावरील विश्वास दर दिवशी वाढत चालला आहे "
१९२१ मध्ये काँग्रेस अधिवेशन पार पडले,त्यातील असहकार चळवळीने त्यांना तुरूंगात जावे लागले वयाच्या पस्तीसाव्या वर्षी १९२३ मध्ये हेच कलाम काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष झाले.
१९२७ मधील सायमन कमिशन, मिठाचा सत्याग्रह, असहकार चळवळ आंदोलनामधील सक्रीय सहभागामुळे त्यांना वेळोवेळी वेगवेगळया तुरुंगात जावे लागले भारतीय मुसलमानांत राष्ट्रीय ऐक्याची भावना निAमाण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कार्यरत राहून इ स १९२९ मध्ये 'नॅशनल मुस्लिम पक्ष'ची स्थापना करून त्यांचे अध्यक्षपदही काँग्रेसने 'कलाम' यांचेकडेच ठेवले
८ ऑगस्ट १९४२ मध्ये मुबंई येथे पार पडलेल्या ऐतिहासिक अधिवेशनात मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली 'भारत छोडो' आंदोलन सुरू झाले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून टाकलेले ते एक पुढचे पाऊल होते मात्र त्या आंदोलनाने त्यांना नजरकैद व्हावे लागले त्यावेळी त्यांना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात ठेवण्यात आले तुरूंगातील वेगवेगळया एकूण अशा १० वर्षापेक्षा अधिक काळातील शिक्षेने त्यांना बराच मानसिक त्रास झाला होता याच दरम्यान त्यांची पत्नी'जुलेखा बेगम' यांचेही निधन झाले
१९४६ मध्ये कॅबिनेट मिशनमध्ये मौलाना आझाद यांनी 'स्वतंत्र पाकिस्तान 'या मागणीच्या कल्पनेला कडाडून विरोध केला त्याचे कारण विषद करताना त्यांनी वेगळया पाकिस्तानमुळे प्रश्न सुटणार नसुन उलट प्रश्नांचा गुंता वाढुन समस्यांमध्ये भरमसाठ वाढ होईल असे बैठकीत ठणकावून सांगितले होते अखेर भारत-पाकिस्तान फाळणीमुळे अखंड भारताचे स्वप्न विरून१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला
कलाम यांच्या लेखन कौशल्यामुळे व त्यांच्या योगदानामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री होण्याचा बहुमान मौलाना आझाद यांना पंडीत नेहरू यांनी मंत्रीमंडळ तयार करताना दिला आझाद हे दोनवेळा संसदेवर निवडून गेले त्यांच्या मृत्यूसमयीपर्यंतच्या शिक्षणमंत्री पदाच्या काळात विदयापीठ अनुदान आयोग, साहित्य , संगीत नाटक , ललीत कला ॲकडमी इ संस्था ॲकडमी इ स्थापन केल्या त्यांच्या या दीव्य कार्याने भारताचे नाव शिक्षण, संस्कृती, साहित्य आणि कला क्षेत्रात उज्ज्वल झाले
आझाद यांचे 'इंडिया विन्स फ्रीडम' हे आत्मचरित्र तर दास्ताने करबला, गुब्बारेखातिर, तजकिराह या ग्रंथसंपदा प्रसिध्द आहेत देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या या महान राष्ट्रीय नेत्याने तमाम भारतीयांना राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचे कार्य करण्याचे आवाहन जणू त्यांच्या जीवनकार्यातूनच केले अशा या अत्यंत बुद्धीवंत आझाद यांनी २२ फेब्रुवारी १९५८ रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतला
आझाद यांच्या महान कार्याबदद्ल भारत सरकारने २६ जानेवारी १९९२ रोजी त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न'हा सर्वोच्च नागरीसन्मान देवून त्यांच्या कर्याचा आदर्श भारतीयांसमोर ठेवला त्यांचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर हा सन २०११ पासून राष्ट्रीय शिक्षणदिन म्हणून साजरा होत आहे,हाही त्यांचा एक बहुमानच आहे.
सौ.महेजबीन शकील बागवान,
जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, बेलापूर,
ता श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर
९६२३४६४७३७