श्री साईंच्या सर्व धर्म समभावाची शिकवण अंगीकारणारे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शहा मुस्ताक अली यांच्यावर वाढदिवसाप्रित्यर्थ होत आहे शुभेच्छांचा वर्षाव ! - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

10 November 2022

श्री साईंच्या सर्व धर्म समभावाची शिकवण अंगीकारणारे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शहा मुस्ताक अली यांच्यावर वाढदिवसाप्रित्यर्थ होत आहे शुभेच्छांचा वर्षाव !


 


राजकुमार गडकरी शिर्डी

राहता येथील ज्येष्ठ पत्रकार शहा मुस्ताक अली यांचा आज गुरुवार दिनांक १०/११/२०२२ रोजी वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ज्येष्ठ पत्रकार शहा मुस्ताक अली हे राहाता येथील सामाजिक कार्यकर्ते असून ते नेहमी समाजसेवेमध्ये कार्यरत असणारे समाजसेवक आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून त्यांची सर्व समाजासाठी असणारी धडपड ,तळमळ सातत्याने सुरू असते. सर्व जाती-धर्मातील आणि तळागाळातील गोरगरिबांसाठी ,त्यांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ ही सर्वांनाच प्रेरणादायी ठरत असते. सर्वांशी मिळून, मिसळून वागणारे, स्पष्ट वकृत्व असणारे, विनोदी व नेहमी हसतमुख राहणारे शहामुस्ताक अली यांना यापुढेही अधिकाधिक आयुष्य मिळून सामाजिक सेवेच्या कामे आणखीन त्यांना पाठबळ मिळावे आणि अधिकाधिक जोमाने त्यांनी यापुढे समाजकार्य करावे अशीच सर्व पत्रकार बंधू तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहेत. नेहमी श्री साईंच्या सर्व धर्म समभावाची शिकवण आपल्या आचरणातून पार पाडणारे,श्रद्धा सबुरीचा संदेश अंगीकारणारे शहा मुस्ताकभाई अली हे एक दिलखुलास असे व्यक्तिमत्व असल्याने त्यांना तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून, राज्यातून, विविध क्षेत्रातून ,सोशल मीडियावर, प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. अनेक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना विविध ठिकाणी आतापर्यंत अनेकदा सन्मान मिळालेला आहे. असे हे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते असणारे शहा मुस्ताक अली यांना वाढदिवसानिमित्त व त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांना यापुढेही अधिकाधिक आयुष्य प्राप्त होवो. सुखी, संपन्न, उत्तम आरोग्य ,असे त्यांचे जीवन जावो. हीच साई चरणी प्रार्थना,

पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !

भाई युग युग जिओ हजारो साल ! साल के दिन हो पचास हजार !

LightBlog

Pages