अखेर शिर्डी ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीला यश, साई समाधीवरील काचा व जाळ्या काढल्या ; भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

09 November 2022

अखेर शिर्डी ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीला यश, साई समाधीवरील काचा व जाळ्या काढल्या ; भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण




 राजेंद्र बनकर - शिर्डी 

 साईसमाधी मंदिरातील काचा व जाळ्या काढण्याचा निर्णय  निर्णय बुधवारी संस्थांनी घेतल्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून साई भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना दर्शन घेण्याकरिता सुलभ व्हावे याकरिता साई समाधी मंदिरात असलेल्या काचा व जाळ्या काढण्यात यावा तसेच द्वारकामाई गुरुस्थान हे मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवावे द्वारकामाई मंदिरात चबुतऱ्यावर जाऊन दर्शन घेता यावे. शनि, महादेव. गणपती या मंदिरासमोरील असलेल्या जाळ्या काढाव्या अशा विविध मागण्या मान्य होण्याकरिता शिर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांना अनेकदा  निवेदन दिले होते. परंतु ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी  पुढाकार घेऊन शिर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांना या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करून मागील आठवड्यापासून याबाबत विविध बैठका घेण्यास सुरुवात केली होती. तसेच संस्थांने भाविकांना दर्शन घेण्याकरिता योग्य प्रकारे उपाययोजना न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. .                                   महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे  यांना शिर्डीतील ग्रामस्थांनी व साईभक्तांनी साई समाधी मंदिरातील काचा व जाळ्या तसेच द्वारकामाई  व गुरूस्थान मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले करून गाभाऱ्यात सर्व भाविकांना प्रेवेश द्यावा या विषयी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती. ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खा. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांना मंदिरातील काचा व जाळ्या काढण्याच्या सूचना केल्या होत्या. बुधवार ९ नोव्हेंबर पासून साईबाबा संस्थाने काचा व जाळ्या काढल्या आहेत. मात्र जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचा लढा सुरूच राहील अशी ग्रामस्थांची भूमिका कायम आहे. साईबाबा संस्थाने  समाधी मंदिरातील काचा व जाळ्या काढल्या असल्या तरी द्वारकामाई,गुरुस्थान हे दोन्ही मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवावे तसेच शनी, गणपती व महादेव मंदिर परिसरातील काढून हा परिसर भाविकांना दर्शन घेण्याकरिता खुला करावा अशा विविध मागण्या मान्य होण्याकरिता शनिवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी शिर्डी ग्रामस्थांनी सर्वपक्षीय बैठक हॉटेल सिटी हार्ट याठिकाणी सकाळी १० वाजता बोलवली असुन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत.

- साई मंदिरातील काचा व जाळ्या काढण्याचा निर्णय घेण्याकरिता खूप उशीर झाला. हे खूप आदी करायला पाहिजे होते. याआधी शिर्डी ग्रामस्थांनी काचा काढण्याबाबत आंदोलन केले होते.साई संस्थाने घेतलेला निर्णय हा अतिशय चांगला असून भक्तांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा आहे. संस्थानच्या अधिकाऱ्यांनी भक्तांच्या हिताचे निर्णय घेऊन खुर्चीचा वापर भक्तांच्या सेवेसाठी करणे गरजेचे आहे. 

कैलासबापू कोते -:प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शिर्डी.


 - शिर्डीत कमी गर्दीच्या काळात भाविकांना साई समाधीचे दर्शन घेण्याकरिता काचा व जाळ्या लावू नये अशी मागणी वर्षभरापासून  शिर्डी ग्रामस्थांनी तसेच विश्वस्त मंडळातील काही विश्वस्तांनी कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. तसेच काही दिवसापूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन काचा व जाळ्या काढण्या संदर्भात विनंती केली होती.ना. विखे पाटील व खा.विखे पाटील यांच्या सूचनेवरून बुधवारी संस्थांनी मंदिरातील काचा व जाळ्या काढल्या त्याबद्दल ना. विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील व साईबाबा संस्थानचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार. 

प्रमोद गोंदकर, ग्रामस्थ व साई भक्त शिर्डी


भक्तांना दर्शन व्यवस्था खुले झाले हे सर्व श्रेय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व खासदार सुजय विखे पाटील तसेच ग्रामस्थ व साईभक्त या सर्वांना आहे.  उशिरा का होईना आमच्या मागणीची दखल घेतली त्याबद्दल साई संस्थानचे आभार. या पुढील काळात भक्तांना सुख सुविधा व संरक्षण मिळण्याकरिता शिर्डी ग्रामस्थांचा लढा सुरूच राहील. कमलाकर कोते, जिल्हाध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना, शिर्डी

LightBlog

Pages