साईबाबांच्या झोळीत १३ महिन्यात ३९८ कोटी दान तर या दरम्यान १ कोटी ५० लाख साई भक्तांनी घेतले साई समाधीचे दर्शन - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

18 November 2022

साईबाबांच्या झोळीत १३ महिन्यात ३९८ कोटी दान तर या दरम्यान १ कोटी ५० लाख साई भक्तांनी घेतले साई समाधीचे दर्शन





 राजेंद्र बनकर - शिर्डी

  देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या  साईबाबा संस्थानच्या दानपेटीत १३ महिन्यात ३९८ कोटीपेक्षा अधिक विक्रमी दान जमा झाले असून या दरम्यान १ कोटी ५० लाखांहून अधिक साई भक्तांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.कोरोनाच्या काळानंतर ७ ऑक्टोबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत  साईबाबांच्या दानपेटीत साई भक्तांनी भरभरून दान दीले असून या १३ महिन्यात  साईंच्या झोळीत भक्तांनी यावर्षी विक्रमी दान दिल्याची नोंद झाली आहे. भक्तांनी दिलेल्या दानात  दक्षिणा पेटीत १६८ कोटी, रक्कम देणगी स्वरूपात  ७७ कोटी,  ऑनलाइन देणगी ७३ कोटी, चेक व डी.डी देणगी १९ कोटी,  क्रेडिट व डेबिट कार्ड देणगी ४२ कोटी, मनीऑर्डर देणगी २ कोटी, सोने व चांदी देणगी वगळता  २३४ कोटी पेक्षा जास्त  देणगी स्वरूपात दान साईभक्तांनी बाबांच्या झोळीत टाकले आहे .  सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दानपेटीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी साई मंदिर बंद होते. कोविडचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी कमी झाल्यानंतर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुल झाले तेव्हापासून शिर्डीत बाबांच्या दर्शनाकरिता विक्रमी गर्दी होऊ लागली. शिर्डीत जगभरातून भक्त साईंच्या दर्शनासाठी येतात. सबका मालिक एक तसेच सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून साई भक्त बाबांकडे पाहतात. शिर्डी देशातील  नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी रेल्वे व विमान सेवा सुरू झाल्याने बाबांचे  दर्शन घेण्याकरिता भक्तांना शिर्डी येथे येण्याकरिता तात्काळ व्यवस्था उपलब्ध झाल्यामुळे काकडी विमानतळ येथे दररोज शेकडो भाविक विदेशातून येतात तसेच विविध राज्यातून येणाऱ्या साई भक्तांची संख्या दैनंदिन लाखापेक्षा जास्त आहे. साईबाबांच्या दानपेटी यावर्षी विक्रमी भाविकांनी दान टाकले . साईबाबा संस्थाने भाविकांना सुलभ दर्शन करता यावे म्हणून १०९ कोटी खर्चाचे नवीन दर्शन रांग उपलब्ध केली आहे. या ठिकाणी एकाच वेळी १० हजार साई भक्त बसू शकतील अशी वातानुकूलित हॉलची व्यवस्था केली आहे. ही नवीन दर्शन रांग व्यवस्था नवीन वर्षात सुरू होणार असून भक्तांना या व्यवस्थेमुळे  अनेक तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. दर्शन रांगेत व्यवस्थित बरोबरच संस्थांने २१८ कोटी खर्चाचे एज्युकेशनल कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम हाती घेतली असून ते पुढील वर्षी चालू होणार आहे. भक्तांना शिर्डीत साई दर्शन घेण्याकरिता सुलभ व्यवस्था व्हावी याकरिता संस्थांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले असून लवकरच ते भक्तांच्या सेवेसाठी सुरू होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत यांनी सांगितले.

LightBlog

Pages