राजेंद्र बनकर - शिर्डी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी मार्फत श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका-२०२३ चे गुरुवारच्या शुभ मुहूर्तावर मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांचे शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, संजय जोरी, कैलास खराडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, प्रकाशने विभाग प्रमुख अरुण पाटील व कर्मचारी उपस्थित होते.