अशोक पॉलिटेक्निक येथे अभियांत्रिकी आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

18 November 2022

अशोक पॉलिटेक्निक येथे अभियांत्रिकी आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन




  श्रीरामपूर (प्रतिनिधी):

श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोकनगर येथील अशोक कारखाना संलग्न अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक पॉलिटेक्निक येथे इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ई- १ उत्तर विभागीय दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अशोक जिमखाना येथे करण्यात आले. यावेळी पहिल्या सामन्याचे उदघाटन अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक रामभाऊ कासार, संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत उत्तर विभागातील एकूण १४ संघाने सहभाग नोंदवला. यामध्ये पहिला सामना अजितदादा पवार कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, वडाळा महादेव व शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी, पाचेगांव यामध्ये रंगला. उत्तर विभागातील एक उपांत्यपूर्व विजेता संघ व दक्षिण मधील एक संघ असा अंतिम सामना दि. १९ नोव्हेंबर रोजी काष्टी येथील परिक्रमा पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये खेळविण्यात येणार आहे.

    सदरच्या क्रिकेट स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे, अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, सहसचिव भास्कर खंडागळे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे व कार्यकारिणी सदस्य विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, सौ.शितलताई गवारे, प्राचार्य अंजाबापू शिंदे यांचे सहकार्य लाभले.

सदरचे सामन्याचे पंच म्हणून नीलेश शेरकर व योगेश डेंगळे तसेच समालोचक अरुण कडू व गुणलेखन म्हणून रामेश्वर पवार काम पहात आहे. या स्पर्धेसाठी क्रीडा समनव्यक सचिन कोळसे, अधिक्षक प्रताप राऊत व इतर कर्मचारी परिश्रम घेत आहे.

LightBlog

Pages