ग्रामस्थांनी मांडल्या विविध अडचणी, यंदा संस्थानची मदत नाही मिळाली
राजेंद्र बनकर - शिर्डी
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी शिर्डीतील अराध्य दैवत राजा विरभद्र महाराज याञा उत्साहात पार पडली आहे. शिर्डी शहराच्या नजीकच्या दोन कि.मी.अंतर असलेल्या बिरोबाबनात हा याञौत्सव पार पडला.यावर्षी श्रींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दीने २५ वर्षातील रेकॉर्ड तोडले गेले असल्याचे भक्त मंडळीनी व्यक्त केले आहे. तर दरवर्षी मोठ्या उत्साहात याञेच्या तिसऱ्या दिवशी कुस्ती हगामा भरवला जातो यात जिल्ह्याभरातुन नामवंत पैलवान हजेरी लावत असतात माञ यावर्षी श्री साईबाबा संस्थानची कुस्ती हगामास मदत मिळाली नसल्याने आणि शिर्डी नगरपंचायतनेही काही अत्यावश्यक सेवेकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याञेतील कुस्ती विजेत्यांसाठी व नियोजनासाठी श्री साईबाबा संस्थान नेहमीच सहकार्य करत आले आहे माञ यावर्षी ञिसदस्य समिती पुढील अडचणीमुळे ही मदत मिळाली नसुन काही ग्रामस्थांच्या पुढाकारातुन हा कुस्ती हगामा घेण्यात आल्याचे राजा विरभद्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नानासाहेब काटकर यांनी सांगितले आहे. तर
शिर्डी नगरपंचायतकडे वारंवार पाठपूरावा करुनही मंदिर परिसरात साधे स्वच्छतागृहही नाही व शिर्डी ते बिरोबाबन रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन वर्षभरात अनेक कार्यक्रम या धार्मिक स्थळावर होतात यामुळे रस्ता रुंदीकरण करुन उत्कृष्ट रस्ता व्हावा अशी मागणी काटकर यांनी केली आहे. प्रथम
विजेत्या पैलवानास २१ रुपये प्रथम बक्षिस हे डी.युवा.शक्ती शहराच्या वतीने देवून त्यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे किरण बनकर यांनी सांगितले. बिरोबाबनात कुस्ती चाहत्यांची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती तर यावेळी पुरुष पैलवानांच्या कुस्त्याचा डाव चांगलाच रंगला असतांना एका पैलवान गायञी थोरात या मुलीला स्पर्धकच भेटला नसल्याचे तिला विजेते जाहीर करुन बक्षिस देण्यात आले प्रसंगी या मुलीने विजय मिळाला माञ कुस्ती खेळण्यासाठी स्पर्धक नसल्याची खंत व्यक्त केली.