वृत्तपत्र वितरक राजेंद्र राहिंज वस्तीवर चहा व सोसायटीचे संचालक आण्णासाहेब काळे वस्तीवर नाष्टा घेतला
भोकर (वार्ताहर) - श्रीक्षेत्र नेवासा येथून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा अर्थात अध्यात्मीक साक्षरता अभियानाअंतर्गत श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथील प.पु.गुरूवर्य डॉ.किसन महाराज साखरे यांचे मार्गदर्शनाखालील पायी दिंडी सोहळ्याचे भोकर येथे वडजाई मित्र मंडळ, वृत्तपत्र वितरक राजेंद्र राहींजवस्ती व भोकर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक आण्णासाहेब काळे यांचेवस्तीवर उत्साहात स्वागत करण्यात आले.
गेल्या तेहतीस वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या या दिंडी सोहळ्याचे सालाबादप्रमाणे यावर्षीही भोकर बसस्टँड परीसरात वडजाई मित्र मंडळ व वृत्तपत्र वितरक राजेंद्र राहींज यांचे वस्तीवर उत्साहात स्वागत करण्यात आले, दरवर्षी येथे या दिंडीचा सकाळचा चहा येथे असतो. त्याप्रमाणे येथील वृत्तपत्र वितरक श्री.राजेंद्र राहींज व सौ.ज्योती राहींज या दाम्पत्याचे हस्ते सपत्नीक पादुकापुजन करण्यात आले. यावेळी येथील भजनी मंडळाने टाळमृदूंगाचे गजरात या दिंडीचे स्वागत केले. यासोहळ्यात भागवतराव पटारे, परशुराम खंडागळे, ठकसेन तागड, बाळासाहेब बेरड, ज्ञानदेव बेरड, भागवत जोशी, भानुदास वाकडे,भानुदास बेरड आदिंसह अबालवृद्धांसह महिला सहभागी झाल्या होत्या.
तर येथून जवळच श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गालगत वस्ती असलेले भोकर सोसायटीचे संचालक आण्णासाहेब काळे यांचेवस्तीवर ही या दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी येथे नाष्ट्याची सुविधा करण्यात आली होती. यावेळी सोसायटीचे संचालक आण्णासाहेब काळे व सौ.अलका काळे या दाम्पत्याचे हस्ते पादुका पुजन करण्यात आले. यावेळी शरदराव खेडकर, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, डॉ.भाऊसाहेब काळे, रावसाहेब काळे, बाळासाहेब काळे, अशोक काळे, मच्छींद्र काळे, अरूण काळे, दिपक काळे, भास्कर फासाटे आदिंसह महिला व युवक युवती सहभागी झाले होते.
या श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथील प.पु.गुरूवर्य किसन महाराज साखरे यांचे मार्गदर्शनाखाली साधकाश्रमाचे प्रमुख मोहनसिंग राजे महाराज हे नेतृत्व करत आहेत. या दिंडी सोहळ्यात नेवासा तालुक्यातील दत्तात्रय महाराज कोकणे, लातुर येथील अरूण माळी, चंद्रभाण सांगळे, किशोर कुलकर्णी, जालना जिल्ह्यातील प्रभाकर महाराज सुरासे, अद्वैत महाराज वाघमारे, उन्मेश महाराज वाघमारे, अशोकराव सराटे, गणेश महाराज कान्हेर, संगमनेर तालुक्यातील साकुर येथील संतोष महाराज गाडेकर सर, सौ.प्रतिभाताई गाडेकर मॅडम, आळंदी देवाची येथील महाकैवल्य तेजोनिधी श्री ज्ञानोबाराय दिंडी सोहळ्याचे प्रमुख संपत महाराज सुरासे, राहाता तालुक्यातील लोणी येथील संगीत शिक्षक प्रल्हाद महाराज देशमुख, विणेकरी सुधाकर महाराज दराडे आदिंसह मोठ्या संख्येने साधक व भाविक सहभागी झालेले आहेत.