भोकर (वार्ताहर) :;श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे तुलसीविवाहाने काकडा आरतीची सांगता करण्यात आली. सालाबादप्रमाणे यावर्षीही भोकर येथील हनुमानमंदिर, संत शिरोमनी सांवता महाराज मंदिर, वडजाईवस्ती व हनुमानवाडी येथे काकडा आरती उत्साहात संपन्न झाला. त्या गावातील हनुमानमंदिर येथे काकडा आरती व भजनी मंडळाचेवतीने तुलसीविवाहाने काकडा आरतीची सांगता झाली. यावेळी महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले.
श्रीक्षेत्र भोकर येथे नेहमीप्रमाणे उत्साही वातावरणात काकडा आरती उत्सव संपन्न झाला. हनुमानमंदिर येथे विणेकरी भागवतराव महाराज पटारे यांचे मार्गदर्शनाखाली तर संत सावता महाराज मंदिर येथे निवृत्ती महाराज विधाटे यांचे मार्गदर्शनाखाली काकडा आरती उत्साहात संपन्न झाला. येथील हनुमान मंदिर येथे पुरोहीत योगेश गुरू यांनी पौराहित्य करत तुलसीविविाह संपन्न झाला. यावेळी काकडा आरती सदस्य व भजनी मंडळाने केलेल्या वर्गणीतून महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले.
यावेळी विणेकरी भागवतराव महाराज पटारे, सतीष शेळके, ज्ञानेश्वर काळे, दिपक पटारे, मच्छींद्र काळे, आण्णासाहेब वाकडे, नामदेव तागड, राम न्हावले, शाम न्हावले, कोंडीराम तागड, चांगदेव राहिंज,मच्छींद्र खंडागळे, विठ्ठल आबुज, भानुदास अभंग, कान्हु आहेर, भानुदास वाकडे, बाळासाहेब मुरकूटे, विजय उगले, कैलास न्हावले, अशोक शिंदे, संजय लोखंडे, प्रभाकर राहींज, अशोक वाकडे, माधव आबुज, गोरख चव्हाण, श्रीधर खेत्री आदिंप्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते. तर संत सावता महाराज मंदिर येथे निवृत्ती महाराज विधाटे यांचे मार्गदर्शनाखाली नानासाहेब विधाटे, मोहन पांढरे, लता केसरकर, सुमन विधाटे आदिंसह भजनी मंडळ सहभागी झाले होते.