भोकर येथे तालुका विधी सेवा समीती अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व नागरीकांचे कायदेविषयक सशक्तीकरण कार्यक्रम संपन्न
भोकर (प्रतिनिधी) : मुलांनी विनापरवाना वाहन चालवित असताना अपघात झाल्यास आई व वडील दोघांनाही शिक्षा होवू शकते, त्यामुळे पालकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, त्याच बरोबर आपल्या वाहनांचा विमा काढून घ्या, हयगय करू नका असे सांगत असतानाच सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे समजून घ्या. समाजाप्रती आपले ऋण असते यातून वकील मंडळी अशा कार्यक्रमातून समाजापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहचवित असतात. प्रलंबीत खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी, तडजोड व समझोत्याने वाद मिटावेत, त्यातून आपली आर्थीक नुकसान टळते व वेळ ही वाचतो, त्यासाठी न्याय व्यवस्थेकडून येत्या १२ नोव्हेबर रोजी श्रीरामपूर न्यायालय येथे लोकअदालत होत आहे, त्यात जास्तीत पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सत्र न्यायधिश तथा श्रीरामपूर तालुका विधी समीतीचे अध्यक्ष अभिजीत नांदगावकर यांनी केले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान येथे तालुका विधी सेवा समीती अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व नागरीकांचे कायदेविषयक सशक्तीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायधिश अभिजीत नांदगावकर हे होते तर दिवाणी न्यायधिश (वरीष्ठस्तर) व्ही.बी.कांबळे, दुसरे दिवणी न्यायधिश (कनिष्ठ स्तर) एन.के.खराडे, तीसरे दिवाणी न्यायधिश(कनिष्ठस्तर) सौ.एस.डी.खोत, चौथे दिवाणी न्यायधिश(कनिष्ठ स्तर) सौ.पी.ए.पटेल व मुंबई जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील आदि प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी वृद्धांनी आपली स्थावर पाल्यांच्या नावावर केली असली तरी त्यांचेकडून योग्य सांभाळ होत नसल्यास आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजेच वृद्धपकाळातही आपली इस्टेट आपल्याला परत घेता येते. प्रत्येकाने आपला कर वेळेवर भरला पाहीजे, आपण कर भरला तर आपल्याला नागरी सुविधा मिळू शकतात याची जाणीव ठेवून ग्रामपंचायत, नगरपरीषद, पालीका, महापालीका यांचे कर वेळेत भरणा करा, त्यांना न्यालयात येण्यास भाग पाडू नका म्हणजे तुम्हाला न्यायालयात यावे लागणार नाही असे दिवाणी न्यायधिश(वरीष्ठस्तर) व्ही.बी.कांबळे यांनी सांगीतले.
यावेळी दुसरे दिवणी न्यायधिश(कनिष्ठ स्तर) एन.के.खराडे, तीसरे दिवाणी न्यायधिश(कनिष्ठस्तर) सौ.एस.डी.खोत, चौथे दिवाणी न्यायधिश(कनिष्ठ स्तर) सौ.पी.ए.पटेल यांचेसह सरकारी वकील अॅड.शिल्पा चिंतेवार, अॅड.तंजिला शेख व अॅड.आरीफ शेख आदिंनी अधिकार व कर्तव्य, तडजोडीने तंटे, वाद, खटले मिटविण्याचे फायदे, जेष्ठ नागरीकांचे अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आले मुलभूत हक्क व अधिकार, कायद्याची माहीती व पुरातन काळापासून आलेली मध्यसथाची भुमिका, हुंडा देणे, घेणे व प्रवृत्त अथवा प्रात्साहित करणे हा कायद्याने असलेला अपराध आदि विविध विषयांवर उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन वकील संघाचे सचीव अॅड.अतुल चौधरी यांनी केले. तर आभार अॅड. जीवन पांडे यांनी मानले. यावेळी श्रीरामपूर वकील संघाचे सदस्य अॅड.सुभाष चौधरी, सचीव अॅड.अतुल चौधरी, खजीनदार अॅड.जीवन पांडे, अॅड.प्रसन्न बिंगी, अॅड.आरीफ शेख, अॅड. तंजीला शेख, अॅड.स्वाती तोरणे, अॅड. गणेश सिनारे, उमेश बाले, श्री मंडलीक, पो.हे. काँ. रवींद्र पवार आदि प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी अशोक कारखाण्याचे संचालक पुंजाहरी शिंदे, सरपंच दत्तात्रय आहेर, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब विधाटे, उपाध्यक्ष गणेश छल्लारे, युवा नेते महेश पटारे, ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, सुदाम पटारे, नारायण पटारे, सुर्यभाण शेळके, ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड, सागर दारूंटे, ज्ञानेश्वर झिने, मारूती डूकरे, नामदेव वाकडे, बबन आहेर, योगेश दंडवते, रामदास ढोकणे, पोपट पटारे, सोपान शेजूळ, बळीराम काळे, अश्वीनी पवार व निर्मला चतुर आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.
फोटो क्यापशन
भोकर - येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान येथे तालुका विधी सेवा समीती अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व नागरीकांचे कायदेविषयक सशक्तीकरण कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना सत्र न्यायधिश अभिजीत नांदगावकर समवेत दिवाणी न्यायधिश(वरीष्ठस्तर) व्ही.बी.कांबळे, दुसरे दिवणी न्यायधिश (कनिष्ठ स्तर) एन.के.खराडे, तीसरे दिवाणी न्यायधिश(कनिष्ठस्तर) सौ.एस.डी.खोत, चौथे दिवाणी न्यायधिश(कनिष्ठ स्तर)सौ.पी.ए.पटेल व मुंबई जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील आदिंसह मान्यवर दिसत आहेत.
भोकर - येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान येथे तालुका विधी सेवा समीती अंतर्गत कायदेविषयक जनजागृती व नागरीकांचे कायदेविषयक सशक्तीकरण कार्यक्रम प्रसंगी कायदेविषयक फलक प्रदान करताना सत्र न्यायधिश अभिजीत नांदगावकर समवेत दिवाणी न्यायधिश(वरीष्ठस्तर) व्ही.बी.कांबळे, दुसरे दिवणी न्यायधिश (कनिष्ठ स्तर) एन.के.खराडे, तीसरे दिवाणी न्यायधिश(कनिष्ठस्तर) सौ.एस.डी.खोत, चौथे दिवाणी न्यायधिश (कनिष्ठ स्तर) सौ.पी.ए.पटेल व मुंबई जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, सरपंच दत्तात्रय आहेर, बाळासाहेब विधाटे,गणेश छल्लारे, महेश पटारे आदिंसह मान्यवर दिसत आहेत.