प्रिंटर,चार्जर आणि किराणा मालासह
१ लाख ३३ हजार रुपयांची चोरी
जावेद शेख पाचोरा
पाचोरा तालुक्यातील निंभोरी बु ! येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास विकास परमेश्वर शेळके यांच्या कृणाल किराणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने कटरने तोडून आत प्रवेश केला. दुकानातील प्रिंटर,तीन तेलाचे डबे, तीन पिशव्या,चार्जर, कॅमेरा तसेच दुकानातील ड्रावरमधील २ हजार ५०० रुपयांसह विविध किराणा माल असा एकुण १ लाख ३२ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल चोरुन अज्ञात चोरटे पसार झाले.सदरील घटनेप्रकरणी पिंपळगांव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मोंढाळे ते वाणेगांव मेनरोड लगत असलेल्या निभोंरी बु ! गावातील कृणाल किराणा दुकान दुकान मालक विकास परमेश्वर शेळके हे दि. २२ रोजी मंगळवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. विकास शेळके हे नित्यनियमाप्रमाणे दि.२३ रोजी बुधवारी सकाळी ६.४५ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदरचा प्रकार निदर्शनास आला. अज्ञात चोरट्याने कटरने दुकानाचे शटर तोडून विविध वस्तू व किराणा मालाची चोरी करून ड्रावरमधील रोख २ हजार ५०० रुपयांसह १ लाख ३२ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पसार झाले. शेळके यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. आर. के. पाटील हे करीत आहे.
प्रतिनिधी जावेद शेख - पाचोरा