श्रीरामपूर (वार्ताहर) पुस्तक हे संस्कार आणि शब्दज्ञानाचं भक्तीमंदिर असून नातवाच्या वाढदिवसाला आजोबांच्या पुस्तकाचे प्रकाशन करणे ही खरी वाचन शिदोरीची औक्षवंत भेट असल्याचे मत प्रा.सौ. पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या "मातृपितृ देवोभव"या पुस्तकाचे प्रकाशन नातू निर्मिक यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने करण्यात आले, त्यावेळी प्रा. सौ. पल्लवी नंदकुमार सैंदोरे बोलत होत्या, अध्यक्षस्थानी सौ. शोभा सुभाष मोरे होत्या.संयोजक गणेशानंद उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पुस्तक प्रकाशनाचे नियोजन केले.'मातृपितृ देवोभव 'ह्या पुस्तकाचे संपादक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी माहिती दिली.आजच्या काळात आईवडील हे दुर्लक्षित होत आहेत.आईवडील हेच खरे आपले दैवत आहे,त्यांचे उपकार जीवनभर जपायचे असतात हा आदर्श आजच्या उगवत्या पिढीवर होण्यासाठी नातवाच्या वाढदिवसप्रसंगी हे पुस्तक प्रत्येक मुलाच्या, आईवडिलांच्या हाती असले पाहिजे. श्रावणबाळ हे मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक प्रत्येक मुले, पालकांना आवडले आहे याबद्दल डॉ. उपाध्ये यांनी आनंद व्यक्त करीत आपल्या या पुस्तकाचे प्रकाशन संयोजकांनी केले, हा आदर्श घेण्यासारखा आहे,असे सांगितले. प्रा. सौ. पल्लवी सैंदोरे यांनी वाढदिवस असे साजरे करावेत की पुढच्या पिढीत वाचनाची गोडी निर्माण होईल.सर्व उपस्थितांना पुस्तकांची अनमोल भेट मिळाल्याबद्दल फकिरा वाघमारे, कचरू जोर्वेकर,सौ.प्रिया देवकर, सौ.लक्ष्मीबाई गाढे,सौ.श्रद्धा तुळे,सौ. जयश्री जोर्वेकर, कु.आराध्या सैंदोरे,कु.सिद्धी बोरुडे,कु. मानसी सैंदोरे, कु. प्रिया डेंगळे, सौ.कोमल गणेश बोरुडे,सौ.वैशाली गाढे,सौ. स्मिता माळी,सौ. सुनंदा वाघमारे,बारसे परिवार, वैष्णवी माताडे,मागुबाई, शीतल कारले,नितीन जोर्वेकर, प्रथमेश जोर्वेकर, धनुष बोरुडे आदिंनी अशी संस्कारपुस्तके मिळाली म्हणून आनंद व्यक्त केला.संयोजक सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी प्रत्येकास पुस्तके देऊन आभार मानले.