मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करत
दिले विविध मागण्यांचे निवेदन
राजेंद्र बनकर शिर्डी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिर्डीत सपत्निक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले,यावेळी शिवसेना अहमदनगर जिल्ह्याच्यावतीने बाळासाहेबांची शिवसेनेचे शिर्डी लोकसभा जिल्हाप्रमुख कमलाकर कोते आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर पाटील देवकर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना चे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच
शिर्डी व परिसरातील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री यांना निवेदनही देण्यात आले.
या निवेदनात १) सावळीविहीर ते अहमदनगर रस्ता तातडीने पुर्ण झाला व्हावा,२) गोदावरी कालवे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, ३) शेती महामंडळाची मौजे शिंगवे शिवारातील पडीक ३०० एकर जमीन साईबाबा संस्थानला देऊन त्याठिकाणी शेगावचे धर्तीवर सुंदर बगीचा (उद्यान) उभारण्यात यावे यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी. ४) श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचारी यांना संस्थान सेवेत कायमस्वरूपी करावे, ५) शिर्डी विमानतळवर नाईट लँडिंग सुरु करावे६) श्री साईबाबा मंदिरातील दर्शन व्यवस्था पुर्वरत सुरु करावी, श्री साईभक्तांना चांगली व सन्मानजनक व्यवस्था मिळावी
आदी मागण्यासंदर्भात निवेदन देऊन त्यावर चर्चा केली.यावेळी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांनी आपल्या मागण्यांसाठी नक्कीच विचार करु असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील देवकर यांनी मुख्यमंत्री यांचा सत्कार केला,याप्रसंगी नेवासा येथील जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, संपर्क प्रमुख सचिन जाधव,जिल्हाप्रमुख (दक्षिण) बाबुशेठ टायरवाले,युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, जिल्हासंघटक विजय काळे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी चौधरी, राहाता तालुका प्रमुख नाना बावके, कोपरगांव तालुका प्रमुख रावसाहेब थोरात,संगमनेर तालुका प्रमुख रमेश काळे,नेवासा तालुका प्रमुख सुरेश डी.के. श्रीरामपूर तालुका प्रमुख बापू शेरकर, नेवासा शहरप्रमुख बाबासाहेब कांगने,श्रीरामपूर शहरप्रमुख सुधीर वायखींडे, संगमनेर शहरप्रमुख दिनेश फटांगरे, राजेंद्र शेळके,राहुल गोंदकर सुनील बारहाते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.