जावेद शेख पाचोरा
अखिल मराठा समाज सेवातर्फे भगतसिंग कोश्यारी यांचा मराठा समाज बांधवांनी निवेदन देऊन जाहीर निषेध केला.महाराष्ट्र तथा अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाद्ल बेताल वक्तव्य करणारे मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांचा जाती द्वेष भावनेने आताच्या व्यक्तींशी तुलना करून संपूर्ण मराठ्यांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. आम्ही कसे मोठे व विद्वान हे दाखविण्याचा व सळक्या मानसिकतेचा प्रत्यय दिला आहे. आपल्या पदाची देखील प्रतिमा- गरिमा लांच्छित केली आहे. म्हणून त्यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करावी. जेणेकरून महापुरुषांबद्द्ल असे बेताल वक्तव्य करण्याची कुणी हिम्मत करणार नाही. व समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही,आम्ही समस्त छत्रपती प्रेमी मा. राज्यपाल कोश्यारी यांचा जाहीर निषेध करतो अशा तीव्र प्रतिक्रिया मराठा समाज बांधवांतर्फे देण्यात आल्या असून अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना देण्यात आले .या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.योगेश पाटील सर, कार्याध्यक्ष धनराज एन.पाटील,सचिव संजय पाटील, सदस्य ॲड. दिपक पाटील ,मराठा क्रांती मोर्चा चे पाचोरा अध्यक्ष सचिन सोमवंशी, गणेश शिंदे,राजेंद्र सूर्येवंशी, प्रमोद धना पाटील गाळण, राजेंद्र धनराज पाटील (बाबाजी) ,अनिल विश्वसराव पाटील ,समाधन बापू पाटील, राकेश गोकुळ पाटील सर ,एस.एस.पाटील, गजमल पाटील, सुरेश पाटील , राजू भैया पाटील व समस्त समाज बांधव उपस्तित होते.
प्रतिनिधी जावेद शेख - पाचोरा