सहकारी सेवा सोसायटीच्या संस्था नियुक्त सचिवांची " स्वाभिमानी सचिव संघटना, अहमदनगर " स्थापन - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

22 November 2022

सहकारी सेवा सोसायटीच्या संस्था नियुक्त सचिवांची " स्वाभिमानी सचिव संघटना, अहमदनगर " स्थापन




 रमेश जेठे अहमदनगर

 जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायटीच्या संस्था नियुक्त सचिवांची " स्वाभिमानी सचिव संघटना,अहमदनगर " स्थापन करण्यात आली.



 अहमदनगर येथील मधुरंजनी सभागृह येथे सचिवांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. संस्था नियुक्त सचिव यांच्या विविध मागण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यात जवळपास दोनशे अडीचशे सचिव हे संस्था नियुक्त आहे. महाराष्ट्रात सहकार हे शेतकरी विकासाचे नेहमी धोतक राहिले आहे. सहकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवाला नेहमी न्याय देण्याचे व उभे राहण्याचे बळ दिले जाते. त्याच माध्यमातून ग्रामीण भागात सेवा सोसायटी ही शेतकऱ्याच्या थेट सेवेत असते. जिल्हा बँकेच्या संलग्नतेतून शेतकरी बांधवाना कर्ज वाटप, विविध व्यवसाय व शासनाच्या विविध योजना अश्या महत्वाच्या भूमिकेत सोसायटी कामकाज करत असते. या सर्व कामकाजचा मुख्य हिस्सा म्हणून नेहमी सचिव राहून त्या कामकाजाला न्याय देण्याचे काम करत असतो.परंतु शासन स्तरावर सचिवाचा मात्र कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही. सदरचे सचिव देखील संस्थेच्या अख्यारीत येणारे सर्वच काम करत असतात परंतु बँकेच्या माध्यमातून अश्या संस्था नियुक्त सचिवाना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. जिल्हा बँक दरवर्षी सचिवाच्या पगाराकरिता अंशता निधीची तरतूद करते सदरची रक्कम जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग करते परंतु संस्था नियुक्त सचिव यापासून नेहमी वंचित राहतात. त्यामुळे संस्था नियुक्त सचिवना जिल्हास्तरीय समितीमध्ये वर्ग करावे, सेवा नियम लागू करावा अशा विविध मागण्याना वाचा फोडण्यासाठी सचिवानी नगर येथे मेळावा घेतला. यावेळी संघटनेचे नामकरण अकोले तालुका प्रतिनिधी गणेश रेवगडे यांनी सर्वांच्या वतीने  "स्वाभिमानी सचिव संघटना अहमदनगर " असे करताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी सचिव बांधवाची भाषणे पार पडली. यावेळी कर्जत चे भिवा कवडे यांनी संघटनेचे महत्व सांगितले तर नगर चे रावसाहेब सोनार यांनी संस्था नियुक्त सचिव यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मुकुंद सातपुते संगमनेर, रवी पवार कोपरगाव, संतोष कळमकर श्रीगोंदा, मंगेश देशमुख पारनेर, सोमनाथ डांगरे शेवगाव, जगदाळे भाऊसाहेब जामखेड, संतोष पाटील नेवासा, सातपुते भाऊसाहेब राहाता, कदम भाऊसाहेब राहुरी प्रतिनिधी उपस्थित होते.

LightBlog

Pages