🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
हरवले बालपण, हरवले ते अंगण।
शिंपीत असे सडा, आई करीतसे सारवण।।धृ।।
नामस्मरणाने देवाच्या, सकाळ सुरु व्हायची
दिवसभर साऱ्यांना, ऊर्जा देऊन जायची
भूपाळीचे सूर कानी, ऐकू येतसे भजन
शिंपीत असे सडा, आई करीतसे सारवण।।१।।
पहाटेच व्हायचं स्नान, हाती अगरबत्ती असायची
गरम गरम न्याहारी, आई जेवायला द्यायची,
मनसोक्त खेळायचं, फिरायचं सारं वन
शिंपीत असे सडा, आई करीतसे सारवण।।२।।
हरवलं मामाचं पत्र। अन धावून लगोरी फोडनं
काँक्रीटच्या चार भिंतीत, फक्त मोबाईल घेऊन बसणं
नाही दिसत पहाट, नाही पक्ष्याचे कुजन
शिंपीत असे सडा, आई करीतसे सारवण।।३।।
झाडे , वेली, फुले छान, आसमंती डुलायची
खेळणे, फिरणे, बागडणे, सारीच मज्जा असायची
हरवलं सगळं आता, राहिलं फक्त प्रदूषण
शिंपीत असे सडा, आई करीतसे सारवण।।४।।
डॉ. किरण पेठे, नागपूर
मो.९३५९०२३३४१