महिलांसाठी दि २२ ते ३० नोव्हे.दरम्यानं मोफत रक्त व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
बेलापूर प्रतिनिधी: बेलापूरःग्रामापंचायत बेलापूर बुll आणि प्राथमिक आरोग्य केन्द्र यांच्या संंयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत महिलांसाठी मोफत रक्त तपासणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खांडागळे यांनी दिली. सदरच्या अभियानाबाबत माहिती देताना त्यांनी सांगीतले की, मंगळवार दि.२२ नोव्हेंबर ते बुधवार दि.३० नोव्हेंबर या कालावधित पुढीलप्रमाणे महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात येणार आहे.
मंगळवार दि.२२ (सातभाई वस्ती अंगणवाडी).बुधवार दि.२३ (जे.टी.एस हायस्कूल, अंगणवाडी), गुरुवार दि.२४ (कु-हे वस्ती,अंगणवाडी), शुक्रवार दि.२५ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ,गायकवाड वस्ती),शनिवार दि..२६ (खटकळी गावठाण,अंगणवाडी), सोमवार दि. २८ (रामगड अंगणवाडी), मंगळवार दि. २९ (सुभाषावाडी अंगणवाडी), व बुधवार दि.३० (जि.प.मुलांची प्राथमिक शाळा, अंगणवाडी) यानुसार नमुद दिवशी व ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी १२ वा.यावेळेत महिलांची रक्त तपासणी केली जाणार आहे, सोबतच या आरोग्य तपासणी शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, मधुमेह तपासणी, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, कॅल्शियम तपासणी आदि रक्त चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. याबाबत माहितीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देविदास चोखर (मो.क्र.9511768013)
यांचेशी संपर्क साधावा. सदरच्या मोफत रक्त तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच महेन्द्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी तगरे यांनी केले आहे.