राजेंद्र बनकर - शिर्डी
कुठलीही डिग्री संपादन नसताना हवामान तज्ञ पंजाब डख यांनी शिर्डी वि.वि.का सेवा सोसायटीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना पाऊस, थंडी, गारपीट, वीज दुष्काळ, अतिवृष्टी केव्हा होते असे विविध उदाहरण सांगून शेतकरी बांधवांना हवामानाचा अभ्यास कसा करावा याविषयी माहिती दिली. शिर्डी वि.वि.का.सेवा सोसायटीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात हवामानातील बदल याविषयी माहिती देताना पंजाब डक म्हणाले. आपल्या देशाची शासकीय यंत्रणा इंटरनेट सॅटॅलाइट यावर अभ्यास करून हवामानाचा अंदाज देतात. माझाही सॅटॅलाइट, इंटरनेट यावर अभ्यास आहे परंतु कालांतराने सॅटॅलाइट इंटरनेट बंद पडले तरीही नैसर्गिक पद्धतीचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांना हवामानाचा अंदाज देऊ शकेल यासाठी १५ वर्षापासून माझा अभ्यास सुरू आहे. ज्या वर्षी गावरान आंब्याला मोठ्या प्रमाणात कैऱ्या येतात व नागरिक मोठ्या प्रमाणात गावरान आंब्याचा रस खाण्याचा आनंद घेतात त्यावरची मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो. आपल्या घरातील इलेक्ट्रिक ट्यूब किंवा बल्ब यावर रात्री मोठ्या प्रमाणात कीटक बसली की पुढील ४ दिवसात पाऊस येणार . मे महिन्यात पहिल्या आठवड्यात जोराने वारे वाहू लागले की शेतकऱ्यांनी शेती कामे लवकर करावी. सरड्याच्या डोक्यावर लाल कलर आला युवा रंग बदलू लागला तर २ दिवसात मान्सून येणार असे समजावे. घोरपड बिळाच्या बाहेर तोंड काढून ठेवायला लागल्या तर ८ दिवसात पाऊस येणार. कोकिळेचे गुंजन १० जून पर्यंत चालू राहिले तर दुष्काळ पडण्याचे संकेत समजावे. मुंग्यांनी मोठ्या उंचीवर वारूळ बांधले तर मोठ्या प्रमाणात पाऊस होणार. पावसाळ्यात डोंगरावरचे मंदिर जवळ दिसू लागले की समजावे आज पाऊस येणार. पावसाळ्यात विमानाचा आवाज कानावर आला की ३ दिवसात पाऊस येणार असे समजावे. यावर्षी गावरान आंब्याला मोहोर नव्हता परंतु बाकी आंब्यांना मोहोर होता परिणामी यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. चिंचेच्या झाडाला खूप चिंचा आल्या की शेती पिकांना चांगला भाव मिळेल व शेतकरी मालामाल होईल असे समजावे. १५ मे ते ३० मे या दरम्यान ज्या ठिकाणी पावसाचे थेंबे पडेल त्या ठिकाणी दमदार पाऊस होण्याचे संकेत आहे. रेल्वे रुळावरून जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या शेट्टीचा आवाज दुसऱ्या गावापर्यंत गेला की समजावे सकाळी ९ वाजता पाऊस येणार. माणसांना दम्याचा आजार आहे अशांना दम लागण्यास सुरुवात झाली समजावे पाऊस सुरू होणार आहे. चिमण्या धुळीत अंघोळ करताना दिसल्या की समजावे ४ दिवसानंतर पाऊस येणार. २२ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान राज्यात गारपीट होते प्रामुख्याने खडक जमिनीवर, डोंगर, कॅनॉल, नदी , तळ्याच्या बाजूला गारपीट होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे काळ्याभोर जमिनीवर गारपीट होत नाही. पूर्व दिशा कडून पाऊस आला की संपूर्ण मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असे समजावे. मागील २ वर्षापासून पावसाने पूर्वेकडून पडायला सुरुवात झाल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणे धो धो पाऊस पडत आहे. राज्यात काँक्रीट रस्ता, मोठमोठ्या शहरांमध्ये उंच बिल्डिंग तसे औद्योगीकरण यामुळे तापमान वाढत आहे. परिणामी पावसाचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली तर पावसाचा पडण्याचा वेग नक्कीच कमी होईल. विज पडण्याचे मुख्य कारण अर्थिंग आहे. विजेला अर्थिंगचे आकर्षण आहे .त्यामुळे मंदिराचा कळस, नारळाचे उंच झाड ,मोबाईल टावर, डोंगर या ठिकाणी वीज पडण्याचे प्रमाण ज्यादा आहे. आपल्या घरावर बांधकामासाठी काढलेली गज उघडे ठेवू नये कारण विजेचे आकर्षण त्या गजाकडे होते. पावसाळ्यात पायात चप्पल व बूट असणे आवश्यक आहे त्यामुळे आर्थिक पासून बचा होतो. उपग्रहाचा अभ्यास करून जगातील कोणत्या दिशेला पाऊस पडेल याचा मी अभ्यास करून सांगू शकतो. असे विविध उदाहरण हवामान तज्ञ डक यांनी शेतकरी मळ्यात शेतकरी बांधवांना देऊन हवामानाचा अंदाज कसा करावा याबाबत माहिती दिली. यावेंळी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, बाभळेश्वर कृषी विभागाचे शैलेश देशमुख, गणेशचे व्हाईस चेअरमन प्रताप जगताप, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, दिगंबर कोते, भानुदास गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, विजय कोते, सोसायटीचे चेअरमन विजय गोंदकर, व्हाईस चेअरमन बाळासाहेब काटकर संचालक तानाजी गोंदकर, प्रमोद गोंदकर, विलास कोते, बाळासाहेब जगताप, गोपीनाथ गोंदकर, प्रमिला शेळके, सुनिता कोते, आशाबाई गोंदकर, बाळासाहेब गायकवाड, नितीन कोते, विकास कोते, रवींद्र कोते , आप्पासाहेब कोते, किरण कोते, सचिव संदीप बडे यांच्या शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत चेअरमन विजय गोंदकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रमोद गोंदकर यांनी मानले.
दरम्यान शिर्डी प्रेस क्लबच्या मिट दि प्रेस या कार्यक्रमात पंजाब डख यांचा शिर्डी प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष पञकार प्रमोद आहेर यांनी शेतकऱ्यांना वरदान ठरत असलेल्या डख यांच्या कार्याचा शासन दरबारी उचीत सन्मान व्हावा यासाठी साईंच्या पवित्र भूमीत त्यांच्या या कार्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.यावेळी विविध माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते