शौकतभाई शेख श्रीरामपूर
भारतरत्न मौलाना आझाद यांनी आधुनिक शास्रे व आधुनिक विचारांना प्राधान्य दिले असे उद्गार तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे यांनी काढले .त्यापुढे असेही म्हणाल्या की,अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहनुद्दीन अहमद असे आहे. त्यांना 'वाचस्पती' ही पदवी मिळालेली होती. विविध भाषांमध्ये ज्ञान त्यांनी मिळवले होते. तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान,गणित या विषयांचा अभ्यास केला होता. लोक जागृतीसाठी त्यांनी 'अल हिलाल' आणि 'अल बलाग' हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. तत्कालीन हिंदू व मुस्लिमांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रखर संघर्ष केला.खरा धर्म मानवता धर्म आहे .या मानवतावादी धर्माचे सर्वांनी आचरण करावे आणि समाजाची व देशाची सेवा करावी असे मौलाना आझाद यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. ते एक प्रभावी वक्ते होते. उत्तम लेखक होते. 'इंडिया विन्स फ्रीडम' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे ते सर्वांनी वाचावे असेही त्या म्हणाल्या.ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.सतिश पावसे यांनी जयंतीचे नियोजन केले.अभिवादन करण्यासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.