कार्येक्षेत्रातील सर्वसामान्य नागरीक बोलती पोलिस अधिकारी असावातर असा !!
पुणे (ग्रामीण) जिल्ह्याच्या दौंड तालुका अंतर्गत यवत पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक नारायण पवार यांचे यांच्या कार्यांविषयी छोटासा अलेख...!
शौकतभाई शेख श्रीरामपूर
शहाणा असेल त्याने पोलिस स्टेशनची पायरी चढू नये अशी समाजात पुर्वीपासुनच म्हण प्रचलित आहे,याचा अर्थ असा होतो की भांडणे तंटा,करु नये, अवैध व्यावसाय अथवा गैरमार्गाचा अवलंब करु नये अन्यथा मग पोलिसदादा सोडणार नाही,यासाठी आपसात समन्वय राखावा,एकदुसऱ्याशी सौजन्याने वागावे अशी शिकवण पोलिस स्टेशन मधील अधिकाऱ्यांकडून जर मिळत असल्यास यास नवल नव्हेतर काय म्हणावे ? मात्र हे काही नवल वाटण्यासारखे आता राहीले नसुन याची प्रचिती यवत पोलिस स्टेशन मध्ये प्रत्येक्षात बघावयास मिळत आहे, याठिकाणी पोलिस अधिकाऱ्याच्या वेषात एक अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम ही पोलिसातील समाजसेवकांचे कामे बजावताना नेहमीच दृष्टीपथास येत आहेत.
याठिकाणी सध्या कार्यरत पोलिस निरीक्षक नारायण पवार हे आपल्या उत्कृष्ट कार्याच्या बळावर दौंड तालूक्यात अथवा पुणे जिल्ह्यातच सुप्रसिद्ध नसून ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आपली शासकीय सेवा बजावली त्या त्या ठिकाणी आपल्या उज्वल कार्यकुशलतेची त्यांनी एक वेगळ्या प्रकारे छाप सोडत आपल्या उत्कृष्ट कामगीरीचा ठसाच उमठविलेला आहे,
दौंड तालुक्यातील यवत हे तसे छोटेसे गांव असलेतरी पुणे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर पुण्यालगत असल्याने तथा जवळच डोंगराळ एरिया देखील असल्याने अवैध व्यावसायिक तथा गुन्हेगारांना या परिसरात जरासी मोकळीक वाटू लागते आणि त्यांचा मुक्त संचार हा मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने गुन्हेगार आणि अवैध व्यावसायिकांना मोठी मोकळीक मिळत असल्याचे जाणवत होते,मात्र याठिकाणी यवत पोलिस स्टेशनचा पदभार पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी हाती घेताच अनेक अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असुन गुन्हेगारांची देखील सळो की पळो अशी स्थिती निर्माण झाली आहे,कारण श्री.पवार यांची मागील कारकिर्द पाहता त्यांनी भल्याभल्या गुन्हेगार आणि अवैध व्यावसायिकांना ठिकाणावर आणले आहे तर अनेकांना तुरुगांची हवा दाखवली आहे,
यापूर्वी त्यांनी पुणे,सातारा जिल्ह्यसह मुंबईत देखील मोठ्या धाडसाने आपली कारकीर्द बजावली आहे,आपल्या अनोख्या कार्यपद्धतीने अनेक गुन्हे गुन्ह्याची उकल करत ते उघडकीस आणून गुन्हेगारांना चाप लावत गुन्हेगारीवर आळा बसविला आहे, पोलीस निरीक्षक श्री.पवार हे कधीच कोणत्याही राजकीय नेत्याच्या प्रेशरला थारा लागु देत नाही,जे काही असेल ते नियमानुसार आणि पोलीस कायद्यानुसारच आपले कर्तव्य बजावताना दिसून येतात,कोणी कितीही मोठा असला तरी त्याला कायद्या प्रमाणेच उत्तरे देऊन योग्य कारवाई करतात, ज्याठिकाणी बदली होईल त्याठिकाणी जर काम करतच कर्तव्य बजावयाचे आहे मग बदली पासुन भीती का बाळगायची ? बदली झाली तरी चालेल मात्र कामे ही कायद्या प्रमाणेच करणार अशी त्यांची कामे करण्याची कार्यपध्दती तथा त्यावरच त्यांचा ठाम विश्वासही असतो, चालू वर्षात त्यांनी दौंड आणि यवत पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत,कोणतेही सण उत्सव, सभा,मोर्चे असो आगदी चोख बंदोबस्त,सर्वांना समान कायद्याची भाषा,गुन्हेगारांना गुन्हेगारांप्रमाणेच वागणूक तर जनसामान्याना पोलिस मित्रासारखी वागणूक,एखादा जनसामान्य नागरीक आपल्या काही कामानिमित्त यवत पोलिस स्टेशनला गेला तर शांततेने त्याचे कामे ऐकून घेत त्यास सन्मान देत, त्यास तात्काळ आणि तत्पर सेवा देणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी हे पोलिस मित्र असल्याचे दिसून येत असल्याने जनसामान्यांना याठिकाणाहुन मिळणारा मोठा आधार खरोखरच स्तूतीजन्य आहे.
मात्र हल्ली काही गुन्हेगार,अवैध व्यावसायीक,गैरकायद्याचे कामे करणारी मंडळी आपल्या काळ्या कुकर्मावर पांघरुण घालण्याकरीता सामाजिक व राजकीय वलय शोधत त्या अश्रयाखाली निर्भयतेने आपली व्यावसाय करु पाहत आहे आणि हल्ली हे सर्वत्रच चालु आहे त्यात यवत कसे अपवाद असु शकणार ? मात्र अशा या महाभागांना पोलिस निरीक्षक नारायण पवार यांची कार्यपद्धती कशी काय आवडणार कारण ते यांच्या राजकीय आणि सामाजिक वलयाखाली असलेले काळेकुट्ट रुपास चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून मग ऐनकेन प्रकारे अशा कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ चांगल्या अधिकाऱ्याची बदनामी करायची,
अशी त्यांच्याच यवत कार्येक्षेत्रात काही अवैध व्यावसायाने बरबटलेली काही संवयघोषित सामाजिक कार्यकर्ते तथा गल्लीछाप पुढाऱ्यांनी म्हणविणाऱ्या लोकांना श्री.पवार यांचे पारदर्शी कामकाच कसे आवडणार आणि ते कसे पचनी पडणार ? म्हणून विनाकारण त्यांचेवर बिनबूडाचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र काही महाभागांकडून रचले जात देखील आहे. मात्र श्री.पवार यांची कार्यपद्धती दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल यांना चांगल्यारित्या माहीत असल्याने ते मात्र त्यांच्या कार्य पद्धतीवर मोठे खुश आहेत.कारण त्यांनाही आपल्या तालुक्यात आणि कार्यक्षेत्रात सक्षम आणि कर्तव्यदक्ष पोलिस हवा होता तो श्री.नारायण पवार यांच्या रुपाने लाभला आहे.
श्री.नारायण पवार यांनी पुणे (ग्रामीण) तात्कालिन पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,बारामती (ग्रामीण) अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते,दौंड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट सेवा बजावली आहे त्यांच्या या निडर आणि तत्पर तथा उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे पुणे (ग्रामीण) पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदनही केले आहे,तथा सध्या ते पुणे (ग्रामीण) पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे धडाडीने उत्कृष्ट कामे चालु आहे.
श्री.नारायण पवार यांच्या सारखे पोलिस खात्यात आणखी कितीतरी कर्तबगार पोलिस अधिकारी,कर्मचारी देखील आहेत,अशा कर्तबगार पोलिस अधिकाऱ्यांमुळे पोलिस खात्याची मान आणखी उंचावत आहे, शासनाने अशा कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यांची दखल घेऊन त्यांना सन्मानित करावे जे णे करुन त्यांचे कामे करण्याचे बळ अधिक गतीने वाढून त्यांच्या कार्यास आणखी गती प्राप्त होऊन जनसामान्यांना मोठा दिलासा आणि आधार मिळेल शेवटी असे नमुद करावेसे वाटते.
पोलिस खात्यातील अशा सर्वच कर्तबगार अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा.