खासदार- आमदारांना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची दुर्दशा दिसत नाही काय ; हिंम्मतराव धुमाळ - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

14 November 2022

खासदार- आमदारांना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची दुर्दशा दिसत नाही काय ; हिंम्मतराव धुमाळ


 


शौकतभाई शेख श्रीरामपूर:

 श्रीरामपूर शहरासह श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील श्रीरामपूर तालुक्यासह मतदार संघात समाविष्ट राहुरी तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा होवून वाट लागलेली असताना मतदार संघाचे खासदार आणि आमदार कोठे गायब आहेत. त्यांना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची दुर्दशा दिसत नाही काय,असा सवाल लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंम्मतराव धुमाळ यांनी केला आहे. तसेच सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे विनाविलंब सुरु न केल्यास सोमवार ता.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येवून जनांदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन गुजरे, पंचायत समितीतील जि.प. सार्वजनिक बांधकाम उप विभागातील उप अभियंता, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन आदी विभागाचे अधिकार्‍यांना देण्यात आले,

या निवेदनात श्री.धुमाळ यांनी म्हटले आहे की, मतदार संघाचे खासदार, आमदारांना श्रीरामपूर शहरासह श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील व राहुरी तालुक्यातील मतदार संघात समाविष्ट गावांच्या संपर्क रस्त्यांची दुरावस्था दिसत नाही. ’खासदार- आमदार दाखवा आणि बक्षिस मिळवा’, अशी गत झाली आहे. शहरातील रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता कळणे कठीण झाले आहे.खड्ड्यांमुळे अनेक लहानमोठे अपघात होत आहेत. याला खासदार, आमदार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप श्री.धुमाळ यांनी केला आहे.

दुर्दशा झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे विनाविलंब सुरु करावीत अन्यथा याप्रश्नी सोमवार ता.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढून जनआंदोलन करण्यात येवून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असा इशारा श्री.धुमाळ यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी अशोक कारखान्याचे व्हा चेअरमन भाऊसाहेब उंडे, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील,अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड्.उमेश लटमाळे, भाऊसाहेब मुळे, भगवान सोनवणे, संजय लबडे, प्रविण फरगडे, प्रमोद करंडे, रमेश सोनवणे, दशरथ पिसे, अनिल कुलकर्णी, विशाल धनवटे, मयुर पटारे, सुनिल बोडखे, राजेंद्र कंत्रोड, रविंद्र बनकर, नवाब सय्यद, प्रदीप जाधव, शंकरराव डहाळे, रामचंद्र कोकाटे, ज्ञानदेव वर्पे, कैलास भागवत, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब करपे, कैलास बनसोडे, लालाशेठ देवी आदी उपस्थित होते.

LightBlog

Pages