शौकतभाई शेख श्रीरामपूर:
अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखाना येथे सहकार सप्ताहाचा शुभारंभ व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे यांचे हस्ते ध्वजारोहन करुन करण्यात आला. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले. अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सहकार सप्ताह निमित्त श्री.उंडे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सुरक्षा विभागाच्या वतीने मानवंदना दिली. या सहकार सप्ताह निमित्ताने दि.२० नोव्हेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहे. कार्यक्रम प्रसंगी संचालक हिम्मतराव धुमाळ, कार्यलक्षी संचालक अशोक पारखे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, अशोक कामगार पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, पर्सोनेल मॅनेजर लव शिंदे, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, चीफ इंजिनिअर बाळासाहेब उंडे, डिस्टीलरी मॅनेजर बाळासाहेब हापसे, डेप्यु. चीफ इंजिनिअर सुनिल चोळके, सिव्हिल इंजिनिअर कृष्णकांत सोनटक्के, स्टोअर मॅनेजर विष्णू लवांडे, ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब राऊत, गॅरेज इनचार्ज रमेश आढाव, विलास लबडे, बाबासाहेब तांबे, गोरक्षनाथ पटारे, राजेंद्र पडोळे, किरण गायकवाड, वसंत शेजुळ, बबन पटारे यांचेसह सुरक्षा विभागाचे व इतर विभागातील कर्मचारी उपस्थित होते.