नांदुर्खीत पिंगळे बंधूनी आई वडिलांचा साजरा केला साधू संतांच्या उपस्थिती मध्ये कृतज्ञता सोहळा
राजेंद्र बनकर - शिर्डी
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आई वडिलांचे स्थान महत्वाचे असून आई वडिलांचे उपकार आपण कधीच परतफेड करू शकत नाही मात्र आपल्या जन्मदात्या माता पित्याला उतरत्या वयातही सुखी समाधानी ठेवून त्यांची सेवा केली तर ही एक परमेश्वराचीच सेवा असते असे मोलाचे उद्गार शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गुलाबराव पाटील यांनी नांदुर्खी येथील राम लक्ष्मण पिंगळे बंधूनी आयोजित केलेल्या आई वडिलांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना काढले. काबाडकष्ट करणाऱ्या माता पित्याला आजची तरुण पिढी जीव लावण्याऐवजी वृद्धाश्रमा कडे पाठविण्यात व्यस्त आहे मात्र परमेश्वराचे आशीर्वाद आपणाला हवे असेल तर आपण आपल्या आई वडिलांचीच सेवा करून जीवनात समाधान मिळविले पाहिजे म्हणून नांदुर्खी सारख्या ग्रामीण भागातील पिंगळे परिवाराच्या वतीने हा कृतज्ञता सोहळा प्रत्येक माणसाला दिशा देणारा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महंत काशिकानंद महाराज यांच्या शुभ प्रेरणेने नांदुर्खी येथे हा कृतज्ञता सोहळा ह.भ.प.युवा कीर्तनकार कृष्णानंद महाराज यांच्या हरिकीर्तनाने संपन्न झाला या कार्यक्रमाला शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष सचिन कोते शिर्डीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रबोध जोशी यांच्यासह झोटींगबाबा दूध संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव चौधरी चेअरमन ज्ञानदेव चौधरी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब चौधरी , सरपंच विद्या ताई चौधरी , माजी सरपंच राजेंद्र चौधरी , शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते अरविंद कोते , जनार्धन स्वामी आश्रमाचे उपाध्यक्ष विलासराव कोते , शपिक शेख बाबासाहेब अनर्थे , भाजपचे नानासाहेब शिंदें , कोल्हारचे अनिल खर्डे , उदिरंगावचे बाळासाहेब रोकडे ,यांच्यासह डोऱ्हाळेचे उपसरपंच बाळासाहेब डांगे , शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी चौधरी , एकलव्य संघटनेचे किरण ठाकरे , साईबाबा मंदिर प्रमुख रमेश चौधरी , आप्पासाहेब चौधरी , पोलिस पाटील सोमनाथ वाणी , चेअरमन जालिंदर वाणी , आर पी आय चे तालुका कार्याध्यक्ष बबनराव कोळगे , आर पी आय चे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , अविनाश गायकवाड डॉ.वसंत गुंड , राजेंद्र पवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. महंत काशिकानंद महाराज यांनी या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर दिंडी पालखी सोहळ्याला नारायणगाव येथे पालखी मुक्काम असलेल्या ठिकाणाहून भ्रमनद्वारी द्वारे आशीर्वाद दिले तर जींवतपणी आई वडिलांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करून शक्य होईल तेवढे पुण्य करावे असेही आशीर्वाद त्यांनी दिले या कार्यक्रमाला नांदुर्खीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही बंधूनी आपल्या आई वडिलांचा हा कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्सवात किर्तनरुपी सेवा देऊन साजरा करून उपस्थित असलेल्या नागरीकांना ही गोड भोजनाचा लाभ दिला. या सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत असुन या कार्यक्रमासाठी गावातील भाऊसाहेब चौधरी , कचेश्वर चौधरी , मोहनराव दाभाडे अविनाश गायकवाड , विशाल कोळगे , संदीप चौधरी , ह.भ.प. दिलीप चौधरी , विरेश चौधरी अविनाश चौधरी , आदींनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव चौधरी यांनी केले तर आभार शिक्षक निखिल हातागळे यांनी मांडले
[ प्रत्येकाच्या जीवनात आई वडिलांचे उपकार मोलाचे आहे त्यांच्या उपकाराच्या उतराई साठी कृतघ्न राहणे हे कर्तव्यच आहे मात्र अनेक सुख दुःखाच्या काळात अनेक शुभचिंतक सगे सोयरे आपल्या मदतीला धावून येतात संकटकाळी वाचविण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्या उपकाराबद्दल ही कृतघ्न राहिले पाहिजे आणि आपल्या जीवनाचे कल्याण केले पाहिजे - राम लक्ष्मण ]
[ आपल्या मुलांनी आपला कृतज्ञता सोहळा साजरा करून थोर मोठ्यांचा शुभेच्छांचा वर्षाव केला यामुळे अक्षरशः भिमराव पिंगळे व राधाबाई पिंगळे दांपत्य आनंदी झाले तर शिर्डीचे डॉ.प्रबोध जोशी यांनी या जेष्ट माता पित्याचा चरणस्पर्श करताच या माता पित्याच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू अनावर ]