राजेंद्र बनकर - शिर्डी
शिर्डीत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त कुटुबांना मुख्यमंत्री सहाय्य निधीतून प्रत्येकी कुटुंब १० हजार रुपये आर्थिक मदत मिळाली असुन शिर्डी शहरातील नुकसानग्रस्त कुटुंबास यामुळे दिलासा मिळाला आहे. शिर्डी येथील लक्ष्मीनगर परिसर सह शिर्डी परिसरात ही मदत मिळत असुन अनेक नुकसानग्रस्त कुटुंबाच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होत आहे.तर लक्ष्मीनगर हा अतिवृष्टीने अतीप्रभावीत झाल्याने येथील नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने मिळालेल्या या मदतीने येथील नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील खा.सदाशिव लोखंडे आदींचे आभार मानले आहे.माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी मिळालेल्या मदतीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबास मोठा आधार मिळाला असल्याचे स्पष्ट केले