शौकतभाई शेख श्रीरामपूर:
तालुक्यातील लाडगांव येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढू नये, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
लाडगांव येथे तहसीलदार यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात संबंधितांना नोटीसा बजावल्या. या ठिकाणी संबंधित गोरगरीब हे अनेक वर्षापासून राहत आहेत. त्यामुळे त्यांना बेघर करु नये. अतिक्रमण हटविल्यास सदरचे गोरगरीब यांचे प्रपंच उघड्यावर पडतील. यासंदर्भात माजी आ.भानुदास मुरकुटे यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांचे सूचनेनुसार लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना अतिक्रमण काढू नये याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती राजवाळ व श्री.काळे यांनी निवेदन स्विकारले. निवेदन देतेवेळी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय भांड, व्हा.चेअरमन जमशेद पटेल, रघुनाथ शेळके, एकनाथ फलके, रशीद शेख, सुभाष फलके, खुदाबक्ष शेख, अशोक थोरे, दिलीप फलके, अनिल पवार, बाळासाहेब मोरे, नितीन फलके, जैतुनबी शेख, रमेश फलके आदी उपस्थित होते.