फतवा फेम अभिनेत्री श्रद्धा भगतच्या हस्ते श्रीरामपूर सुपर क्रिकेट स्पर्धेचं भव्य उद्घाटन - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

21 November 2022

फतवा फेम अभिनेत्री श्रद्धा भगतच्या हस्ते श्रीरामपूर सुपर क्रिकेट स्पर्धेचं भव्य उद्घाटन




 शौकतभाई शेख श्रीरामपूर:

येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रामशेठ टेकावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ वी सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन फतवा चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी श्रीरामपूरची अभिनेत्री श्रद्धा भगत हिच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ.योगेश पुंड, क्रिकेटपटू सिध्दार्थ भगत, ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी, विठ्ठलराव दांगट, दौलतराव पवार,अतुल जाधव, ऋषीकेश नवले,आकाश शिरसाठ,अमोल शिरोळे, संगणक  शिक्षिका प्रतीक्षा भांड, स्पर्धा आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज आदी मान्यवर उपस्थित होते.

२ दिवस चालणारे या स्पर्धेत श्रीरामपूर तालुक्यातील विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत एकूण २४ सामने खेळवण्यात येणार असून विजेत्या संघाला रु. ५०००/- व चषक डिझायनर गॅलरी श्रीरामपूर यांच्यावतीने प्रदान करण्यात येईल. प्रत्येक सामनावीराला प्रशांत भंडारी क्लासेस यांच्या वतीने मानचिन्ह प्रदान करण्यात येईल तसेच वैयक्तिक पारितोषिकमध्ये मालिकावीरासाठी देवासेठ चोरडिया यांच्याकडून बॅट तर प्रशांत माळवे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाजांसाठी टी-शर्ट प्रदान करण्यात येणार आहे.

LightBlog

Pages