श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवकांच्या गैरकारभारावर कार्यवाही होणेबाबत छावा स्वराज्य रक्षक सेनेचे जिल्हा परिषद समोर उपोषण - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

21 November 2022

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवकांच्या गैरकारभारावर कार्यवाही होणेबाबत छावा स्वराज्य रक्षक सेनेचे जिल्हा परिषद समोर उपोषण




 श्रीरामपूर (प्रतिनिधी) :  तालुक्यातील भ्रष्टाचारी ग्रामसेवक यांच्यावर कारवाईसाठी छावा स्वराज्यरक्षक सेनेचे जिल्हा परिषद अहमदनगर समोर आजपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे,

सविस्तर असे की,श्रीरामपूर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांनी शासनाची फसवणूक करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे त्यांच्यावर कारवाई साठी छावाचे जिल्हा परिषद अहमदनगर समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे कारण श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार करून एक महिना उलटला असून कोणतीही कारवाई न केल्यामुळे छावा संघटनेच्या वतीने उपोषण करण्याचा मार्ग निवडला आहे या सर्व ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याचे खोटे कागद पत्रे सादर करून घरभाडे भत्याच्या नावाखाली लाखो रुपयाची लूट केली आहे तसेच १५ वित्त आयोगाच्या कामातही मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ केला आहे तसेच छावाच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे साहेब यांनी कारवाईचे आदेश देऊन ही श्रीरामपूरचे गटविकास अधिकारी परदेशी, अतिरिक्त गटविकास अधिकारी शेख,विस्तार अधिकारी अभंग, चराटे यांनी कोणतीही कारवाई किंवा चौकशी केली नाही त्यांनी आपल्या कामात कसूर केला आहे तरी त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्ड वर ही लाल शेरा मारण्याची मागणी छावा स्वराज्यरक्षक सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली असून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी जी रक्कम लुटली आहे ती शासनाने व्याज सकट ५ पट वसूल करावी आणि सर्व ग्रामसेवकांना त्वरित कायमचे बडतर्फ करावे यासाठी जिल्हा परिषद अहमदनगर समोर आज पासून छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख,छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कोल्हे पाटील, छावाचे योगेश गायकवाड, छावाचे राजाराम शिंदे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

LightBlog

Pages