अश्पाक शेख यांची उपाध्यक्षपदी निवड
झाल्याबद्दल त्यांचा शुभेच्छापर सत्कार
समीर बेग राहाता
राहाता केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची तालुका कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असुन यात असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी अमोल बनसोडे तर उपाध्यक्षपदी अश्पाक शेख यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी ज्येष्ठ केमिस्ट साहेबराव आहेर यांची निवड करण्यात आली आहे.
राहाता तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यकारणी पुढील प्रमाणे- अध्यक्ष : अमोल बनसोडे, उपाध्यक्ष :अशपाक शेख (बाभळेश्वर), उपाध्यक्ष: सूनील लोढा (शिर्डी),
सचिव : विकास नरोडे (कोल्हार), खजिनदार : ज्ञानेश्वर आभाळे, कार्याध्यक्ष : धीरज संकलेचा (पुणतांबा) यांची निवड करण्यात आली आहे.
राहाता तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अश्पाक शेख (चॉईस मेडिकल) यांची निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांकडून शुभेच्छापर त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी एच.आर. उद्योग समूहाचे संचालक वसीम सय्यद,इरफान शेख (अल्पसंख्यांक उपाध्यक्ष राहाता तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), नाजिम पठाण,पापा शेख, राजू शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचीत सर्वच पदाधिकाऱ्यांवर विविध क्षेत्रातून अभिनंदनपर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.