नेवासा प्रतिनिधी:
तालुक्यातील भेंडा (सौंदाळा) येथील पत्रकार कमलेश बाबासाहेब नवले यांची महाराष्ट्र राज्य दारुबंदी जन आंदोलन समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना संस्थापक अध्यक्ष गणेश कदम,मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
श्री.नवले यांनी मागील काळात जिल्हात दारुबंदीसाठी विविध आंदोलने,मोर्चे केले तथा तालुक्यासह जिल्ह्यात दारुबंदीबाबत मोठे जनआंदोलन उभे केले.याचीच दखल घेत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली असल्याचे श्री.कदम यांनी सांगितले.
याप्रसंगी पञकार कमलेश नवले यांनी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीच्या माध्यमातून जिल्हात दारूबंदीविषयी जनजागृती करून दारूबंदीसाठी मोठा लढा उभा करणार असल्याचे सांगितले.यावेळी अक्षय बोधक,विशाल तुपे,स्वनील बनसोडे, अभिजीत बोधक,आप्पासाहेब आरगडे,
आदींची उपस्थिती होती. या निवडीचे माजीमंत्री आ.शंकरराव गडाख, मा.आ.चंद्रशेखर घुले, आदींनी अभिनंदन केले आहे.