श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
सध्याच्या अधुनिक अर्थात ‘मोबाईल‘ युगात क्रिएटिव्हीटी लोप पावत असताना श्रीरामपुरातील ‘सह्याद्री ट्रेकर्स’ या ग्रुपने अनोखा उपक्रम राबविला, बालगोपाळांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा, इतिहासाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी यासाठी ‘किल्ले बनवा‘ स्पर्धा" भरविण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभावेळी स्पर्धकांना प्रेरणा मिळावी यासाठी चित्रकार रवी भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ॲक्रेलिक रंगात कॅन्व्हासवर रॅपीड स्केच साकारले, त्यास तहसीलदार प्रशांत पाटील आणि श्री.भागवत यांचे शिक्षक सोपान सानप सर, डॉ. रविंद्र महाडिक यांच्यासह सर्वच उपस्थितांची भरभरून दाद मिळाली.यावेळी तहसीलदार पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व किल्ले याबाबत सखोल मार्गदर्शन केले. बालव्यख्याता प्रथमेश वर्धावे याने स्फुरन चढावे असे व्याख्यान दिले. कलात्मकता जपण्याच्या दृष्टीने केलेल्या या अनोख्या प्रयत्नाबद्दल सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सचिन भांड,उमेश शिंदे आदीसंसह सर्व सदस्यांचे विशेष आभार मानण्यात आले.