शौकतभाई शेख श्रीरामपूर:
येथील रयत शिक्षण संस्थेच्या डी. डी.काचोळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील प्रभाकर साळवे यांच्या शुभहस्ते डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित 'अवतीभोवती 'या लेखसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
येथील बँक कॉलनीतील मुख्याध्यापक सुनील साळवे यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात लेखक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक मनोगतातून'अवतीभोवती' पुस्तकाची माहिती दिली.सुनील साळवे यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी प्राचार्य टी. ई. शेळके,माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, साहित्यिक सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी सुनील साळवे आणि सौ.संगीता साळवे यांचा शाल, बुके, विविध पुस्तके देऊन सत्कार केला.या उभयतांच्या हस्ते 'अवतीभोवती' पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर सौ.संगीता साळवे यांनी आनंद व्यक्त करीत हा वाड्.मयीन सत्कार आवडले असल्याचे सांगितले.मुख्याध्यापक सुनील साळवे म्हणाले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांची अर्धा डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत,माझी मुख्याध्यापकपदी निवड होताच असे सुंदर पुस्तक प्रकाशन करताना आनंद मिळाला. श्रीरामपूर येथील स्नेहप्रकाश प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. स्नेहलता कुलथे आणि पत्रकार प्रकाश कुलथे यांनी अतिशय सुंदर पुस्तकनिर्मिती केली आहे. मराठीतील ज्येष्ठ कथाकार, गझलकार डॉ. शिवाजी काळे यांची अनुरूप प्रस्तावना लाभली आहे, मलपृष्ठावरील प्रा. शेतकरीकवी पोपटराव पटारे यांनी लिहिलेला अभिप्राय मनोवेधक आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी त्यांचे मित्रवर्य पोपटराव पटारे, डॉ. शिवाजी काळे, पत्रकार प्रकाश कुलथे आणि संमोहनतज्ञ 'पोरका बाबू 'कार डॉ. रामकृष्ण जगताप यांना हे पुस्तक अर्पण केले आहे,असे सांगून मुख्याध्यापक सुनील साळवे पुढे म्हणाले, मला रयत शिक्षण संस्थेने शाखाप्रमुख म्हणून सेवेची संधी दिली, या संधीचे सोने करील. रेडक्रॉस या मोठया कामाचे सर्वत्र कौतुक झाले, राज्यपाल कोशारी साहेब यांच्या हस्ते प्रांत साहेब अनिल पवार यांच्यासमवेत सत्कार झाल्यामुळे या कार्याला बळ मिळाले, याच सेवेभावी तळमळीने मी रयतची सेवा केली, आता अधिक करणार आहे, श्रीरामपूर रयत संकुलाच्या अध्यक्षा मीनाताई जगधने आणि स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहयोगातून शाळेला गुणवत्ता देऊ,सर्वसमावेशकता ठेवून काम करू,अनेकांनी सन्मान केला,अनेक पुस्तके मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.प्राचार्य शेळके यांनी बोलताना सांगितले की, मुख्याध्यापक सुनील साळवे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यामुळे शाळा शैक्षणिक विकासांबरोबर सामाजिक जाणिवेने काम करील असा विश्वास व्यक्त केला. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रेमनाथ सोनुने यांनी नियोजन केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून शाळेला अनेक पुस्तके देऊन आभार मानले.