[.ग्रामस्थांच्या भूमिकेला साईबाबा संस्थानचा नेहमीच सकारात्मक प्रतिसाद असतो - मुख्य.कार्य.अधि.भाग्यश्री बानायत ]
राजेंद्र बनकर - शिर्डी
अनेक महिन्यापासून ग्रामस्थ व साईबाबा संस्थान यांच्यात सुरू असलेल्या वादावर शनिवारी सकारात्मक चर्चा होऊन या वादावर अखेर पडदा पडला. साई भक्तांना सुलभ दर्शन घेता यावे याकरिता अनेक महिन्यापासून शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानकडे मंदिरातील काचा व जाळ्या काढाव्या तसेच द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले ठेवावे व गणपती, महादेव, शनि मंदिरा समोरील असलेले बॅरिगेट्स हटवाव्या तसेच गुरुस्थान मंदिरास परिक्रमा सुरु करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. परंतु साईबाबा संस्थानने ग्रामस्थांच्या सर्व मागणीची दखल न घेतल्यामुळे भक्तांना दर्शन घेण्याकरिता होणारी गैरसोय दूर व्हावी याकरिता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची दिशा ठरवण्याकरिता सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी बैठक घेऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली तसेच याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे तसेच खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खा. सदाशिव लोखंडे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी तात्काळ साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांना मंदिरातील काचा व जाळ्या काढण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे ९ नोव्हेंबर बुधवारी मंदिरातील काचा व जाळ्या काढल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतल्यामुळे भक्तांमध्ये आनंद दिसून आला परंतु द्वारकामाई, गुरुस्थान तसेच इतर मंदिर परिसरात भक्तांना दर्शन घेण्याकरिता मोठी कसरत करून जावे लागत असल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी हॉटेल सिटी हार्ट येथे एकत्र जमून संस्थांच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली. तत्पूर्वी सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढा अन्यथा मार्ग न निघल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवू अशी भूमिका घेतली. दरम्यान शनिवारी दुपारी १ वाजता शिर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या विविध विषयांवर चर्चा झाली यात प्रामुख्याने द्वारकामाई रात्रभर दर्शनासाठी खुली ठेवणे, मंदिरात येण्याकरिता सर्व दरवाजे भक्तांना दर्शन घेण्याकरिता उघडे ठेवणे. जाळ्या काढणे, गावकऱ्यांकरिता स्वतंत्र दर्शन व्यवस्था करणे, नवीन दर्शन रांग तात्काळ सुरू करणे, साईभक्तांना दर्शन रांगेत चहा व इतर सुविधा देणे आशा विविध मागण्या यावेळी ग्रामस्थांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ग्रामस्थांच्या मागणीचे निरसन करताना कार्य. अधि. बानायत म्हणाल्या साईबाबा समाधी मंदिरात काचा व जाळ्यांची उंची कमी करून जेणेकरून भाविकांना समाधीला हात लावता येईल. गर्दीच्या काळात काचा व जाळ्या लावण्यात येतील. द्वारकामाई मंदिर सुरक्षा कारणास्तव रात्रभर दर्शनाकरिता खुले ठेवता येणार नाही. गुरुस्थान मंदिरात भाविकांना परिक्रमा क्रमशः करण्याकरिता पुढील ८ दिवसात मार्ग काढू. अशा विविध विषयांवर २ तास सकारात्मक चर्चा झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी शिर्डीचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते , बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, रवींद्र गोंदकर, नितीन कोते, ताराचंद कोते, निलेश कोते,
अरविंद कोते, उत्तमभैया कोते, दिनकर कोते, सचिन कोते, दीपक वारुळे , किरण गोंदकर, नानासाहेब काटकर, दादासाहेब गोंदकर, सुनील परदेशी ॲड अविनाश शेजवळ, अशोकराव कोते, जगन्नाथ गोंदकर,समीर शेख, सुरेश आरणे, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
(चौकट - ग्रामस्थ यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. भक्तांना दर्शन घेण्याकरिता होणारी गैरसोय दूर करण्याकरिता ग्रामस्थांनी सुचवलेले विषयांवर लवकरच मार्ग काढू. काचा व जाळ्यांची उंची कमी करून गर्दीच्या काळात त्या लावल्या जातील गर्दी कमी असल्यास त्या पूर्णतः काढल्या जाईल. आशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. भाग्यश्री बनायत , मुख्यकार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी.)