राजेंद्र बनकर शिर्डी:
पत्रकार राजेंद्र भुजबळ यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने याप्रकरणी शिर्डी ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध नोंदवित शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकार राजेंद्र भुजबळ यांच्यावर साईबाबा संस्थानने १४ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात वाद घातला अशी फिर्याद दिली होती. त्या आधारे शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये १० नोव्हेंबर रोजी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकार भुजबळ हे १४ ऑक्टोबर रोजी मंदिर परिसरात गेले होते का ? याबाबत साईबाबा संस्थान मधील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशन तपासावे. त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा खरा की चुकीचा हे शोधावे. या गुन्ह्याचा योग्य तपास करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.अशी मागणी यावेळी शिर्डी ग्रामस्थांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देण्यापूर्वी शिर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करण्याकरिता एकत्र जमून पायी चालत शिर्डी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी ग्रामस्थ यांनी पोलीस निरीक्षक यांच्याबरोबर चर्चा करताना सांगितले की आपण सदर गुन्ह्याचा योग्य तपास करून जो कोणी दोषी असेल त्याला कडक शासन करावे. यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपण या गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे करत असून जो कोणी यात दोषी असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे यावेळी निवेदन घेऊन आलेल्या ग्रामस्थांना सांगितले. शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते ,नितीन कोते, निलेश कोते, दादासाहेब गोंदकर, उत्तमभैया कोते, दिनकर कोते, सचिन कोते, अरविंद कोते, रवींद्र गोंदकर, जगन्नाथ गोंदकर , अशोकराव कोते, समीर शेख, वीरेश गोंदकर, मच्छिंद्र गायके ,बापू पवार, राहुल गोंदकर, हेमंत शेवाळे ,देवानंद शेवाळे ,वैभव सोनवणे, साईनाथ कोते ,प्रवीण पन्हाळे, वाल्मीक बावचे, सुरेश वलवे, वैभव सोनवणे, मच्छिंद्र गायके, बापू पवार, सुनील परदेशी, यांच्यासह शिर्डी शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.