शौकतभाई शेख श्रीरामपूर
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील देवकर व कमलाकर पाटील कोते यांच्यासह संगमनेर येथील शासकीय विश्रामगृह येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह मेळावा घेण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला ,युवासैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या अगोदर ते संगमनेर तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी कुटुंबातील सौ.पावसे यांचे विजेचा शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी त्यांच्या वस्तीवर जाऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आदेश देऊन लवकरात लवकर या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासित केले.
त्यानंतर शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे शिवसैनिकांना संबोधित करताना खा. सदाशिव लोखंडे म्हणाले की, लवकरच निळवंडे च्या कालव्यांचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असून त्याच्या लाभ कार्येक्षेत्रातील १२० गावांना होणार असल्याने शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे, तसेच जनसामान्यांची कामे करताना बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष वाढवण्याची जबाबदारी ही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यानी तात्काळ सुरु करावी असे अवाहनही खा. लोखंडे यांनी केले तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, अगामी सर्व निवडणुकीत जे बरोबर येतील त्यांच्या सोबत व जे येणार नाही त्यांच्या शिवाय बाळासाहेबांची शिवसेना निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र पा.
देवकर यांनी सागितले की, बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी शहरात व गावागावात वाड्यावस्त्यांवर प्रत्येक घराघरात जाऊन पक्ष मजबूत करून पक्षाचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व खासदार सदाशिवराव लोखडे यांचे हात मजबूत करून अगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले,
जिल्हाप्रमुख कमलाकर पा.कोते यांनी खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या माध्यमातून गावोगावी केलेल्या विकास कामांची माहिती जनतेसमोर मांडली व गावागावात जाऊन जनतेची काय कामे करायची याची माहिती घेऊन ती शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना मिळवून द्यावी,
या मेळाव्यास संगमनेर व अकोला येथील शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ रहाणे, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, विजय काळे,बाजीराव दराडे, उपजिल्हाप्रमुख एकनाथ यादव, तालुकाप्रमुख रमेश काळे,राजेश सोनवणे, संजय वाकचौरे, बापूसाहेब शेरकर, शहरप्रमुख दिनेश फटांगरे,गणेश कानवडे आदि उपस्थित होते.