देवळाली प्रवरा- येथील मुस्लिम समाजाच्या जुन्या पिढीच्या सदस्या जमरूतबी अहमद शेख(वय-९५ वर्ष) यांचे वृधप काळाने निधन झाले.
त्यांचे मागे चार मुले, तीन मुली,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.इस्लामपुरा परिवाराच्या जुन्या पिढीच्या त्या शेवटच्या सदस्या होत्या.
शेख अरफान सर, फक्कड भाई,अबुभाई, व मनसुरभाई यांच्या त्या मातोश्री होत.
देवळाली प्रवरा येथील मुस्लिम कबरस्थान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.