श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखाना येथील कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.१६) लम्पी आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून ऊस तोडणी मजुरांच्या जनावरांना लम्पी लस मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सदर मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब उंडे, कार्यकारी संचालक संतोष देवकर,मॅनेजर ॲग्री नारायण चौधरी, उपशेतकी अधिकारी प्रदीप शिंदे, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, कारेगाव भाग कंपनीचे मॅनेजर ज्ञानेश्वर बडाख, ऊस विकास अधिकारी विजय धुमाळ, केनयार्ड सुपरवायझर भिकचंद मुठे,अग्री ओव्हरशिअर अभिषेक लबडे,पशुधन पर्यवेक्षक डॉ. प्रकाश आसने, डॉ.शुभम चोरमल,डॉ.प्रणव कोकणे आदी उपस्थित होते.