अवैध धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्यावर ताणली बंदूक; सातगांव डोंगरी परिसरात खळबळ, पोलिसांसमोर मोठे आव्हान. - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

20 November 2022

अवैध धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्यावर ताणली बंदूक; सातगांव डोंगरी परिसरात खळबळ, पोलिसांसमोर मोठे आव्हान.




  जावीद शेख पाचोरा:

 सातगाव (डोंगरी) ता.पाचोरा येथील ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे यांनी पिंपळगाव (हरेश्वर) ता. पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्या विरोधात तक्रार दिल्याने दि.१९ रोजी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान तीन अज्ञातांनी बंदूक रोखून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर अहिरे यांनी तिघांविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत  पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे यांनी त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी बंदूक ताणल्याची तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर अहिरे यांच्या म्हणण्यानुसार मी गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंद्या विरोधात आवाज उठवत आलो आहे. आताही चार दिवसांपूर्वी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परिसरात अवैध धंदे बंद व्हावेत. असे निवेदन सदर पोलिस स्टेशनला देण्यात आल्याने, माझ्यावर दि. १९ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मी गावातील बस स्टँड जवळील पुलावर एकटाच जात असतांना माझ्यावर तीन अज्ञातांनी शिवीगाळ करून बंदूक ताणली. आमच्यात झटापट होत असतांना झालेल्या आवाजाने जवळच असलेले नागरिक पळत आले. त्यामुळे सदर तिघेही इसम मोटरसायकल घेऊन पसार झाले. त्या रात्रीच संशयित तीन अज्ञातांच्या विरोधात ज्ञानेश्वर अहिरे यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. चांगल्या कामासाठी मी आवाज उठवल्याने माझ्यावर झालेल्या अन्याय विरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी ज्ञानेश्वर अहिरे यांनी केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिघां संशयित अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक महेश वाघमारे व बीट हवलदार रवींद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.

LightBlog

Pages